Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

नवी मुंबईतील भंगार व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी न दिल्याने दुकानात घुसून मारहाण केल्याचा आरोप असून इतर चार आरोपींचा शोध सुरू आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 19, 2026 | 04:34 PM
नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • 2 लाखांच्या खंडणीप्रकरणी शिंदे गटाच्या नेत्या पूजा बनसोडे अटकेत
  • खंडणी न दिल्याने दुकानात घुसून मारहाण केल्याचा आरोप
  • मुख्य आरोपी अटकेत; चार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत
 

नवी मुंबईच्या राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले असून पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार इंदिरा नगर परिसरात भंगाराचे दुकान चालवतात. दुकान सुरळीत चालवायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपींकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र व्यापाऱ्याने ही मागणी फेटाळून लावत पैसे देण्यास नकार दिला.

तक्रारीनुसार, त्यानंतर पूजा बनसोडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह संबंधित दुकानात प्रवेश केला. यावेळी व्यापाऱ्याला तसेच दुकानातील कामगाराला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की केल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

घटनेनंतर पीडित व्यापाऱ्याने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी खंडणी, मारहाण आणि धमकीसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला. त्यानंतर मुख्य आरोपी पूजा बनसोडे यांना अटक करण्यात आली.

या गुन्ह्यात रमजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार आणि हुसेन शेख यांचाही सहभाग असल्याचा आरोप असून हे चौघे सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून विविध ठिकाणी तपास सुरू आहे.

सत्ताधारी पक्षाशी संबंधित महिला पदाधिकाऱ्याला अशा गंभीर आरोपांमध्ये अटक झाल्याने या प्रकरणाची राजकीय पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पोलिसांनी हा तपास पुरावे आणि तक्रारीच्या आधारे सुरू असल्याचे स्पष्ट केले असून पुढील चौकशीनंतरच प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.

Hyderabad Crime: नग्न अवस्थेत मंदिरात धाव, देवीची मूर्ती उचलली अन् तलावात उडी; महिला इंजिनिअरच्या रहस्यमय मृत्यू!

Web Title: Navi mumbai shiv sena shinde pooja bansode extortion case arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध
4

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.