Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू

नवी मुंबईतील खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर बंदी असूनही गेलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेल्याची घटना घडली. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असून अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकांकडून दोघांचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2026 | 09:06 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पांडवकडा धबधब्यावर बंदी असतानाही गेलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रवाहाने वाहून नेले.
  • मुसळधार पावसामुळे शोधमोहीम आणि बचावकार्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
  • अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी तैनात असून दोन्ही तरुणांचा शोध सुरू आहे.
नवी मुंबई: प्रशासनाने वारंवार इशारे दिले, धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली, तरीही काही जणांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले… आणि काही क्षणांतच आनंदाची सहल भीषण दुर्घटनेत बदलली. खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यालाही अडथळे येत असून, दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.

काय घडलं नेमकं?

खारघर येथील पांडवकडा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो. मात्र, हा धबधबा जितका सुंदर आहे तितकाच धोकादायकही आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याचा पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि धोकादायक बनतो. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. तरीही अनेकजण या आदेशाकडे दुर्लक्ष करून धबधब्यावर जात असल्याने वारंवार दुर्घटना घडत आहेत. अशाच प्रकारे बंदी झुगारून पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनांत हे दोन तरुण वाहून गेले आहेत. तरूण वाहून गेल्यानंतर त्याची माहिती स्थानिक पोलिस आणि अग्नशमन दलाला देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल दोन कोटी 64 लाखांचे अमली पदार्थ केले नष्ट

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. मात्र, मुसळधार पावसामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान झाला असून, बचावकार्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे दोन्ही तरुणांचा अद्याप शोध लागलेला नाही. बचाव पथकाकडून त्यांचा शोध सुरू असून, हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

बेपत्ता झालेले तरुण कोण?

तळोजा फेज 1 सागरविहार बिल्डिंग, जनता गॅरेजजवळ मोहम्मद मोबशीर मोहम्मद शाहिद हा राहत होता. त्याचे वय वीस वर्षे होते. हा तरूण पांडवकडा परिसरात पाण्याच्या प्रवाहात बुडाला आहे. तर दुसरा तरुणा हा मुंबईतल्या सांताक्रुझचा आहे. त्याचे वय 19 वर्ष आहे. शेण्णोन गॅस्पर किनी असं या तरुणाचं नाव आहे. तो ही धबधब्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे. पांडवकडा धबधब्यावर जाण्यास बंदी आहे. प्रशासनाने आता कडक इशारा दिला आहे. शिवाय धबधब्याकडे जाण्याचा मार्ग ही बंद करण्यात आला आहे. कुणीही धबधब्यावर जावू नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

Ratnagiri Crime: रत्नागिरी हादरलं! धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी; महिलेचा मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: खारघरमध्ये नेमकी काय घटना घडली?

    Ans: पांडवकडा धबधब्यावर बंदी असतानाही गेलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून नेल्याची घटना घडली.

  • Que: बचावकार्याला अडथळे का येत आहेत?

    Ans: मुसळधार पाऊस आणि धबधब्यातील वेगवान पाण्याचा प्रवाह यामुळे शोधमोहीम राबवताना अडचणी येत आहेत.

  • Que: सध्या प्रशासनाकडून काय कारवाई सुरू आहे?

    Ans: अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी शोधमोहीम राबवत असून नागरिकांना धबधब्याकडे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Navi mumbai two youths swept away at kharghars pandavkada waterfall search operation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • rain

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका
1

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी
2

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार
3

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.