काय घडलं नेमकं?
मेटे गावाच्या परिसरात काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानंतर आणि रेल्वे प्रशासनाला संशय आल्यानंतर तातडीने खेड पोलीस आणि रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांनाही तातडीने खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शुभ्रा दिवेकर यांचा मृत्यू झाला होता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सध्या शुभ्रा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर गंभीर जखमी झालेल्या सचिन जुवळे आणि त्यांच्या दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलावर उपचार सुरू आहेत.
चालत्या ट्रेनमधून, त्यातही दीड वर्षाच्या पोटच्या गोळ्याला सोबत घेऊन असा टोकाचा निर्णय या जोडप्याने का घेतला? याचे उत्तर अध्यापत स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. धावत्या एक्सप्रेसमधून उडी मारण्यापूर्वी ट्रेनमध्ये त्यांचे काही भांडण झाले होते का, यादृष्टीने सहप्रवाशांचेही जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
तपास सुरु
शुभ्रा अतिश दिवेकर या महिलेचा रेल्वे ट्रॅकवर कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा लहान मुलगा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. मुसळधार पाऊस आणि वेगाने धावणारी रेल्वे असल्याने उडी मारल्यानंतर तिघेही लोहमार्गाच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. प्राथमिक माहिती आणि उपलब्ध परिस्थितीवरून हा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेमुळे कोकण रेल्वे प्रवाशांसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Beed News: 38 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमुळे तपासाला नवे वळण
Ans: मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी घेतल्याची घटना घडली. यात महिलेचा मृत्यू झाला.
Ans: सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: घटनेमागील नेमके कारण, कौटुंबिक किंवा इतर कोणतेही कारण होते का, तसेच ट्रेनमधील घटनाक्रम काय होता याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.






