Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदाबादहून लातूरकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (५३, रा. परदेशी गल्ली, वैजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2026 | 01:12 PM
Mumbai Accident Malad: अपघातात महिला वकिलाचा मृत्यू; ७० वर्षीय चालकावर व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप,भाजप नगरसेवकाचा हस्तक्षेप

Mumbai Accident Malad: अपघातात महिला वकिलाचा मृत्यू; ७० वर्षीय चालकावर व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप,भाजप नगरसेवकाचा हस्तक्षेप

Follow Us
Follow Us:
  • नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप
  • खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
  • जखमींचा आकडाही आला समोर
वैजापूर : नेहमीप्रमाणे नोकरीसाठी घराबाहेर पडले, मात्र काही वेळातच काळाने घाला घातला. अहमदाबादहून लातूरकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (५३, रा. परदेशी गल्ली, वैजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. सोमवारी (३१ ऑगस्ट) सकाळी सुमारे सहा वाजता समृद्धी महामार्गावरील हडसपिंपळगाव शिवारातील साखळी क्रमांक ४७७ जवळ हा अपघात झाला आहे.

हेमंत दाभाडे हे वाळूज येथील बजाज कंपनीत गेल्या सुमारे ३० वर्षांपासून कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते दररोज वैजापूर-वाळूज असा प्रवास करत होते. सोमवारी सकाळीही ते नेहमीप्रमाणे लक्झरी बसने नोकरीसाठी निघाले होते. मात्र, हडसपिंपळगावजवळ बसने कंटेनरला धडक दिली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्र. (युके ०८ सीबी ७६६०)समृद्धी महामार्गावरुन जात असताना अहमदाबादहून लातूरच्या दिशेने जणाऱ्या खासगी बसने (क्र. एआर २० ए ९२९२) त्याला मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, बसमधील हेमंत दाभाडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्ग प्रशासनाची यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कुटुंबावर शोककळा 

हेमंत दाभाडे यांच्या निधनाची वार्ता वैजापूरमध्ये पोहोचताच कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

हे सुद्धा वाचा : प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

अपघातातील दहा जखमींची नावे

या अपघातात शिवलिंग सुभाष खेडे (वय ६५), चंद्रकांत मोहन देवपूते (वय २२), सतीश राजू लिपणे (वय ४२), कौस्तुभ गंगाधर शिनगारे (वय २४), प्रांजल जितेंद्र सोनार (वय २८), जितेंद्र नरेंद्र सोनार (वय ३५), विश्वजीत अरुणकुमार गवळे (वय १२), सुनील लालमसिंग सोनवणे (वय ४५), संदीप ब्रिजवाल वसईकर (वय ३५) आणि लालचंद भीमालाल मेघवाल (वय ३०) हे जखमी झाले आहेत. सर्वांवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघाताचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल

Web Title: One person died in a collision between a private bus and a container truck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई
2

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
3

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
4

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.