Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनारीजवळ मद्यधुंद पोलिसाने एकाला उडवले; पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न

पुरंदर तालुक्यातील सोनोरीजवळ एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या मद्यधुंद अवस्थेतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 10, 2025 | 06:05 PM
सोनारीजवळ मद्यधुंद पोलिसाने एकाला उडवले; पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न

सोनारीजवळ मद्यधुंद पोलिसाने एकाला उडवले; पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न

Follow Us
Close
Follow Us:

सासवड/संभाजी महामुनी : पुरंदर तालुक्यातील सोनोरीजवळ एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या मद्यधुंद अवस्थेतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर संबंधित पोलिस हवालदार योगेश गरुड याने घटनास्थळावरून पळ काढत गाडीही तातडीने दुरुस्त करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार योगेश गरुड यांनी शासकीय गणवेशात असताना सोनोरी येथील एका हॉटेलबाहेर सहकारी होमगार्डसोबत दारू प्राशन केल्याची माहिती आहे. त्यानंतर चारचाकी चालवून नशेत असतानाच दुचाकीस्वार संजय रामचंद्र मोरे (वय ५५) यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या मोरे यांना पुढे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवारी त्यांचे निधन झाले.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

घटनेनंतर योगेश गरुड याच्यावर कोणतेही कठोर कलम न लावता उथळ स्वरूपाची कारवाई केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्याच्या मेडिकल तपासणीची कोणतीही नोंद नाही, तसेच अपघातग्रस्त गाडी देखील तातडीने वडकी येथील शोरूममध्ये दुरुस्तीसाठी पाठवली गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून पुरावे पद्धतशीर नष्ट करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय

पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या अशा गंभीर प्रकरणातील भूमिकेबाबत नागरिकांत नाराजी आहे. दरम्यान, संजय मोरे यांचा मुलाने सासवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेवटी प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे योगेश गरुड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सौम्य कलमे लावल्याने लगेचच जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कारवाई होणार का?

याप्रकरणी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, योगेश गरुडवर कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून गाडी जप्त केली जावी, तसेच त्याचे मेडिकल व ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्हचा पुरावा घेतला गेला का याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: One person dies after being hit by a drunk police car near sonari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Arrested News
  • Car Accident
  • CM Devedra Fadnavis
  • Purandar

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
1

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?
2

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला
3

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
4

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.