Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोगस औषध कंपन्यांमुळे कोकणचा हापूस संकटात; राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मोठी मागणी

कणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कृषी आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत, अशी आक्रमक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2026 | 02:03 PM
बोगस औषध कंपन्यांमुळे कोकणचा हापूस संकटात; राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मोठी मागणी

बोगस औषध कंपन्यांमुळे कोकणचा हापूस संकटात; राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मोठी मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट दर्जाची खते व कीटकनाशके पुरवल्यामुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधित औषध कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून पीडित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कृषी आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत, अशी आक्रमक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, गणेश गायकर, सुशांत नाईक, प्रशांत शिंदे यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार उपस्थित होते. बैठकीत शेट्टी यांनी कोकणातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या सुल्तानी संकटाचा पाढाच वाचला.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदार अस्मानी संकटासोबतच औषध कंपन्यांच्या मनमानी कारभाराने होरपळला आहे. केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल ३०० कोटी रुपयांची औषधे खरेदी केली आहेत. मात्र, औषध कंपन्यांच्या दरावर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. कीटकनाशके, पीजीआर आणि बुरशीनाशकांचा वापर नेमका कसा करावा, याची माहिती कंपन्यांकडून न दिली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मोजक्याच कंपन्यांच्या औषधांची तपासणी

आंबा पिकासाठी ७० हून अधिक कंपन्या औषधांची विक्री करत आहेत. या औषधांच्या किमतींमध्ये मोठी तफावत असून, रोखीने व्यवहार केल्यास मूळ किमतीत ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. ही बाब संशयास्पद असून गुणनियंत्रण विभाग केवळ मोजक्याच कंपन्यांच्या औषधांची तपासणी करत असल्यामुळे बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.

हे सुद्धा वाचा : शिवभोजन थाळीचा गळा आवळतोय? पुणे जिल्ह्यातील केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट

१९९० पासून नवीन संशोधन कुठे आहे? – बाळा माने

या बैठकीत माजी आमदार बाळा माने यांनी प्रशासनाला धारेवर धरले. १९९० सालापासून गुणनियंत्रण विभाग आणि कृषी विद्यापीठाकडून फळबाग लागवडीसाठी कोणतेही नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात आलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. बोगस कंपन्यांवर विभागाने आतापर्यंत काय कारवाई केली आणि संशोधन विभागाने कीड रोगांवर नेमकी काय भूमिका बजावली, असा जाब त्यांनी विचारला.

Web Title: Former mp raju shetty has made a big demand for farmers from the agriculture commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
2

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
3

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
4

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.