Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आखाती युद्धाचा भोरच्या पोल्ट्री व्यवसायाला ‘शॉक’; निर्यातीला ब्रेक लागल्याने अंड्यांचे दर कोसळले

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. अंड्यांची आंतरराष्ट्रीय निर्यात ठप्प झाल्याने स्थानिक बाजार पेठेत आवक वाढली असून, दरात मोठी घसरण झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2026 | 03:49 PM
आखाती युद्धाचा भोरच्या पोल्ट्री व्यवसायाला 'शॉक'; निर्यातीला ब्रेक लागल्याने अंड्यांचे दर कोसळले

आखाती युद्धाचा भोरच्या पोल्ट्री व्यवसायाला 'शॉक'; निर्यातीला ब्रेक लागल्याने अंड्यांचे दर कोसळले

Follow Us
Follow Us:

​भोर : जागतिक राजकारणातील अस्थिरतेचे पडसाद आता थेट ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर उमटू लागले आहेत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. अंड्यांची आंतरराष्ट्रीय निर्यात ठप्प झाल्याने स्थानिक बाजार पेठेत आवक वाढली असून, दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे.​

 

त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धामुळे मालवाहतूक आणि लॉजिस्टिक साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम आखाती देशांकडे जाणारा अंड्यांचा पुरवठा निम्म्यावर आला असल्याने निर्यात न झालेला माल देशांतर्गत बाजारपेठेत आल्याने अंड्यांचे दर प्रति नग १:५० ते २:०० रुपयांपर्यंत खाली आले असून युद्धामुळे इंधन दरात वाढ झाल्याने रस्ते आणि सागरी वाहतूक खर्च कमालीचा वाढला आहे. एकीकडे अंड्यांचे दर कोसळले असताना, दुसरीकडे उत्पादनाचा खर्च मात्र गगनाला भिडला आहे. युद्धामुळे मका आणि सोयाबीन यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कोंबड्यांच्या खाद्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. औषधे आणि मजुरीचा खर्च धरता, सध्याचा विक्री दर हा उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने व्यावसायिकांचे भांडवल संपत चालले आहे.

भोर तालुक्यात पोल्ट्री हा शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून हे प्रकल्प उभे केले आहेत. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संकटामुळे अनेक फार्म्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ‘उत्पादन जास्त आणि मागणी कमी’ अशा कात्रीत येथील व्यावसायिक अडकले आहेत. म्हणुन अंड्यांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करावी तसेच संकटात असलेल्या व्यावसायिकांच्या बँक कर्जावरील व्याजात सवलत मिळावी व कुक्कुट खाद्यावर अनुदान देऊन उत्पादन खर्च कमी करावा अश्या मागण्या संबंधित व्यावसायिकांकडून केल्या जात आहेत. आखाती देशांतील तणाव जोपर्यंत निवळत नाही, तोपर्यंत निर्यातीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे कमी आहेत. अशा वेळी स्थानिक प्रशासनाने आणि राज्य सरकारने मध्यस्थी करून या ग्रामीण उद्योगाला सावरण्याची गरज असल्याची भावना व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

” सध्याची स्थिती उत्पादकांसाठी मरणासन्न आहे. दररोज हजारोंचा तोटा सहन करावा लागत आहे. बँकांचे हप्ते आणि खाद्याचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने तातडीने पोल्ट्री व्यावसायांसाठी विशेष पॅकेज किंव्हा सवलत जाहीर करावी, अन्यथा हा ग्रामीण भागातील आधारस्तंभ कोसळेल.” – अनिल थोपटे (पोल्ट्री व्यावसायिक भोर)

हे सुद्धा वाचा : बोगस औषध कंपन्यांमुळे कोकणचा हापूस संकटात; राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मोठी मागणी

Web Title: Poultry businessmen are in trouble due to the collapse in egg prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Egg
  • Farmers

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
2

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
3

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
4

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.