Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळ हादरलं! एकावर 4 जणांचा प्राणघातक हल्ला; दांडके अन् तलवारीने बेदम मारहाण

गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चौघांनी एकाला पिस्तूल दाखवून तलवार व लाकडी दांडक्याने डोक्यात व शरीरावर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2025 | 06:10 PM
मावळ हादरलं! एकावर 4 जणांचा प्राणघातक हल्ला; दांडके अन् तलवारीने बेदम मारहाण

मावळ हादरलं! एकावर 4 जणांचा प्राणघातक हल्ला; दांडके अन् तलवारीने बेदम मारहाण

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चौघांनी एकाला पिस्तूल दाखवून तलवार व लाकडी दांडक्याने डोक्यात व शरीरावर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.14) सायंकाळी निगडे (ता. मावळ जि. पुणे) हद्दीत घडली. जखमी फिर्यादी संतोष मारुती करवंदे (वय 40 रा. कल्हाट ता. मावळ जि. पुणे) यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष महादु जाचक (वय 35, रा. स्वराज्य नगरी फ्लॅट नं 4, स्वामी दर्शन अपार्टमेंट तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे, मूळ रा . करवंदे वस्ती कल्हाट ता. मावळ जि. पुणे), आदिनाथ लाला खापे (वय 27 रा. कोंडीवडे ता. मावळ जि.पुणे), रोहन मुरलीधर आरडे (वय 23) व ओमकार देविदास खांडभोर (वय 23) दोघे रा घाटेवाडी पोस्ट वडेश्वर ता. मावळ जि.पुणे) अशी गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे (ता. मावळ, जि. पुणे) हद्दीत डांबरी रोडवर फिर्यादी हे तानाजी भगवान करवंदे, विनोद दादाभाऊ कोयते व नवनाथ बापु देशमुख यांच्यासोबत कार एम. एच. 14 एल. वाय 2842 मधून कल्हाटकडे जात असताना आरोपी संतोष जाचक, अधिनाथ खापे, रोहन आरडे व ओमकार खांडभोर आदींनी गावच्या यात्रेत झालेल्या वादाच्या कारणावरून संगनमत करून त्यांच्याकडे असलेली कार ही फिर्यादीच्या कारला आडवी लावून फिर्यादीची गाडी थांबवून गाडीच्या काचा फोडल्या. संतोष महादु जाचक याने फिर्यादीला पिस्टल दाखवून गाडी मधून खाली उतरण्यास भाग पाडले.

आरोपी संतोष जाचक व तिघांनी तलवार व लाकडी दांडक्याने फिर्यादीला डोक्यावर व शरिरावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला होता. आता आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.  जखमी संतोष करवंदे यांना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल मध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले. वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.

पुतण्याने केला चुलत्याचा खून

आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.

Web Title: One person has been brutally beaten up by 4 persons in maval nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
1

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
2

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
3

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’
4

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.