Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ATM Card Fraud : एटीएम सेंटरमध्ये कार्डची अदलाबदल करून एकाची फसवणूक; तब्बल ४८ हजारांना घातला गंडा

एका नागरिकाला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा करून तब्बल ४८ हजार रुपयांची रोख रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2025 | 11:46 AM
एटीएम सेंटरमध्ये कार्डची अदलाबदल करून एकाची फसवणूक; तब्बल ४८ हजारांना घातला गंडा

एटीएम सेंटरमध्ये कार्डची अदलाबदल करून एकाची फसवणूक; तब्बल ४८ हजारांना घातला गंडा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांना हेरून ते एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या पाठिमागून जात मदतीचा बहाण्याने त्यांची फसवणूक करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद सुरूच आहे. पुन्हा एकदा नवी पेठेतील शास्त्री रोड परिसरात एका नागरिकाला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा केला. मात्र, पैसे निघत नाही म्हणून एटीएम कार्डाची अदलाबदल केली आणि नंतर कार्डचा गैरवापर करून तब्बल ४८ हजार रुपयांची रोख रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बद्रीनाथ शांतीनाथ बनसोडे (वय ४५, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे ११ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शास्त्री रोडवरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे निघत नसल्याने ते थोडे गोंधळले. त्याचवेळी उपस्थित एकाने त्यांना “या मशीनमधून पैसे निघत नाहीत, दुसऱ्या मशीनमधून निघतात, मी मदत करतो” असे सांगितले. त्यांचा विश्वासास संपादन करून त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. दुसऱ्या मशीनकडे वळल्याचा बनाव केला. परंतु त्याने त्यांच्या कार्डाची दुसऱ्या कार्डाशी अदलाबदल केली आणि मूळ कार्ड लंपास केले. नंतर काही वेळातच बनसोडे यांच्या खात्यातून ४८ हजार रुपये काढल्याचा मॅसेज आला. तेव्हा त्यांना हा प्रकार लक्षात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

साडे चार लाखांची फसवणूक

डेबिट कार्ड अॅक्टिव्ह करायचे असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला साडे चार लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तींवर फसवणूकप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदारांना फोनद्वारे संपर्क करून सायबर चोरट्यांनी त्यांना बँकेतून मॅनेजर बोलत असल्याची बतावणी केली. त्यांना डेबिट कार्ड अॅक्टिव्ह करायचे आहे, असे सांगत एक लिंक पाठवली. नंतर लिंकवर माहिती भरण्यास सांगितली. माहिती भरताच सायबर चोरट्यांनी ऑनलाईनरित्या त्यांच्या खात्यातून चार लाख ४७ हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.

Web Title: One person was cheated in pune by swapping cards at an atm center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Arrested News
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Froud News
  • pune crime case

संबंधित बातम्या

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
1

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
2

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
3

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
4

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.