Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा, दोघांना घरात घुसून मारहाण; नेमकं काय घडलं?

चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या टोळक्याने राडा घातला आहे. धक्का लागल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2026 | 12:46 PM
चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा, दोघांना घरात घुसून मारहाण; नेमकं काय घडलं?

चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा, दोघांना घरात घुसून मारहाण; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा
  • दोघांना घरात घुसून मारहाण
  • नेमकं काय घडलं?
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. अशातच आता चिंचवडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या टोळक्याने राडा घातला आहे. धक्का लागल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

ही घटना ७ एप्रिल रोजी रात्री घडली असून याबाबत १६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अनुज अशोक भोईटे (वय २३), रोशन राजेंद्र राणे (वय २५), संकेत संजय शेळके (वय २७), अक्षय शरद चौधरी (वय २६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह कमलेश अशोक पाटील (वय २५), रोहित सयाजी जाधव (वय २५), अब्दुल्ला (वय १९, सर्व रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोज भिल्लू राठोड (वय ३४, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज राठोड आणि त्यांचा मित्र सतीश सोपानराव भोईने या दोघांना आरोपी अनुज भोईटे याचा धक्का लागला. त्यावरून भोईटे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून मनोज राठोड आणि त्यांचा मित्र सतीश भोईने यांना घरात घुसून मारहाण केली. घरातून बाहेर रस्त्यावर नेऊन आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केली. अनुज भोईटे याने मनोज राठोड यांच्या डोळ्यावर हातातील कड्याने मारून त्यांना जखमी केले. मनोज राठोड यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आरोपी अनुज भोईटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पिंपरीत नवनियुक्त आयुक्तांचा ‘दणका’; अवैध बांधकामांना अभय देणाऱ्या दोन अभियंत्यांचे निलंबन

एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर

दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ४७ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

Web Title: An incident has occurred in chinchwad where two people were brutally beaten up by a gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pimpri Chinchwad crime

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.