crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पनवेल: पनवेल शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून भावानेच सख्या भावाचा दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने केवळ एका तासाच्या आत आरोपीला गजाआड करून गुन्हा उघडकीस आणला आहे. ही घटना करंजाडे सेक्टर-7 येथे घडली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार २७ सप्टेंबर रोजी रात्री 8:37 वाजता डायल 112 द्वारे पोलिसांना माहिती मिळाली की करंजाडे सेक्टर- ७ पोलीस चौकीसमोरील रस्त्यावर एका ४५ वर्षीय पुरुषाचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. माहिती मिळताच बिट मार्शल पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस ठाण्यास ही माहिती देण्यात आली.
पोलीस अंमलदार विलास बीरजी कारंडे व राजेंद्र कृष्णा केणी यांनी घटनास्थळी नागरिकांकडून माहिती गोळा केली. आरोपी कसा होता, कोण होता, त्याला कोणी ओळखता काय याबाबत त्यांनी घटनास्थळी चौकशी केली. या माहितीच्या आधारे त्यांनी आरोपीचा शोध सुरु केला. त्यादरम्यान आरोपी नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याला पकडल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून त्याने काबुल केले की दत्तु वाल्या काळे याची आपणच हत्या केली.
अनैतिक संबंधामुळे हत्या
हत्या करणारा आणि ज्याची हत्या झाली हे दोघेही सख्खे भाऊ होते. मृतक दत्तू काळे याचा त्याच्याच चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. ही बाब समोर आल्यानंतर आरोपी नागेश चिडला. त्याच वेळी त्याने आपल्या भावाला धडा शिकवण्याचं ठरवलं होत. त्याच रागातून नागेश याने दत्तूच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनीं आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
शहरातील प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी पालिकेचा महत्वपूर्ण निर्णय
दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने हवा शुद्ध करण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध भागात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एअर बिन प्युरिफायर) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सायन-पनवेल महामार्गावर अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या कळंबोली सर्कल येथे ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरु असून, काम पूर्ण होताच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. महानगराच्या दिशेने प्रवास होत असलेल्या पनवेल पालिकाहद्दीचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासगळ्य़ामुळे वाहतूक कोंडी सारख्या समस्यांना देखील सामोरे जाने लागत आहे.
Pune Crime : दिवसा बँक अधिकारी, रात्री मटक्याचा बुकी; पुण्यातील बँक कर्मचाऱ्यासह १७ जण अटकेत