मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गोरेगाव नेसको सेंटरमध्ये गरबा खेळतांना धक्का लागल्यामुळे दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. यात १९ वर्षीय विध्यार्थी जखमी झाला आहे. या राड्यामुळे शिवसेना खासदार रवींद्र वायकर नेस्को सेंटर विरोधात आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटून नेस्को सेंटरवर कारवाई करण्याची मागणी खासदार रवींद्र वायकर करणार आहेत.
काय म्हणाले रवींद्र वायकर
मुंबईत मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव आणि दांडिया कार्यक्रम सुरु आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या लोकसभा मतदारसंघात 260 ठिकाणी दांडिया गरबा सुरु आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामुळं सामान्य माणसाला खूप मोठा त्रास होतो असे वायकर म्हणाले. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये होत असलेल्या कार्यक्रमामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर आणि जोगेश्वरी विक्रोली लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी होते असेही वायकर म्हणाले. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये सुरू असलेल्या दांडिया गरबामध्ये गरबा खेळण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीमध्ये धक्का लागल्यामुळे मारामारी होत असेल तर ही धक्कादायक घटना आहे असे वायकर म्हणाले. गरबा खेळत असताना जर कोणी मारामारी करत असेल तर पोलीस प्रशासनाने लक्ष घालून तात्काळ कारवाई करत अटक केली पाहिजे अशी मागणी देखील वायकर यांनी केली.
विक्रोळीतील धक्कादायक प्रकरण, मृत घोषित झालेली महिला सापडली जिवंत; काय नेमकं प्रकरण?
मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक महिला जिला मृत घोषित करण्यात आले होते. ती कळव्यात जिवंत सापडली आहे. या महिलेचे नाव मनीषा सराटे असे आहे. मनीषा ही कन्नमवार नगर, विक्रोळी येथील रहिवासी असून ती गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होती, असे सांगण्यात येत आहे. तिच्या कुटुंबियांना तिचा मृत झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्या तरुणीचा शोध घेण्यासाठी विक्रोळी गाठले. तिथे पोलिसांची मदत घेण्यात आली. तेव्हा तपासात ती जिवंत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ती एका तरुणासोबत राहत असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी बरीच मेहनत घेतल्यांनंतर त्या दोघांना कळवा परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीनंतर मनीषाला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल. मनीषा सोबत असलेल्या त्या तरुणाबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आले नाही आहे. यात अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचंही पोलीस सुत्रांकडून समजत आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.
Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ; 26.84 कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट