काय घडलं नेमकं?
मोहळा येथील उत्कर्षा उत्तम जाधव (वय 18) व समीक्षा उत्तम जाधव (वय 16) आणि सिंधू दत्ता जाधव (वय 45) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. उत्कर्षा आणि समीक्षा या दोघी सख्ख्या बहिणी. (Parbhani News) या दोघी आपल्या चुलत बहिणीसोबत गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न समजल्याने त्या पाण्यात बुडाल्या. मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या त्यांची चुलत बहीण सिंधू दत्ता जाधव (वय 45) याही पाण्यात बुडाल्या. याची माहित गावातील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.
भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी तिघींना शोध घेऊन त्यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तिघींचे मृतदेह पुढील तपासणीसाठी सोनपेठ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मोहळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Parbhani News)
धाराशिवमध्ये भोंदूबाबाचा दरबार! भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली अमानुष प्रकार; VIDEO व्हायरल
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. उपचार आणि भुतबाधा घालवण्याच्या नावाखाली एका तथाकथित भोंदूबाबाकडून लोकांचा अमानुष छळ केला जात असल्याचा आरोप होत असून, (Dharashiv News) याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, स्थानिकांकडून तातडीने कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
साताऱ्यात मध्यरात्री भीषण अपघात; कार 3 वेळा पलटी, एका तरुणाचा जागीच मृत्यू
सातारा जिल्ह्यातून अपघाताची बातमी समोर आली होती. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गणपतीमुळे येथे फिरण्यासाठी निघालेल्या तीन मित्रांचा चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. (Accident News) या अपघातात एका २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. एका जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मध्यरात्री कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ घडली. एक जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.(Accident News)
Ans: परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोहळा गावाजवळील गोदावरी नदीत ही घटना घडली.
Ans: उत्कर्षा उत्तम जाधव, समीक्षा उत्तम जाधव आणि सिंधू दत्ता जाधव अशी मृतांची नावे आहेत.
Ans: त्या बुडणाऱ्या मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या होत्या, मात्र त्याही पाण्यात बुडाल्या.






