Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी लोणावळा परिसरात ‘व्हिला/गेस्ट हाऊस’ मध्ये १० दिवस मुक्कामाचे आमिष दाखवून नागरिकाची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 17, 2026 | 06:15 PM
गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी लोणावळा परिसरात ‘व्हिला/गेस्ट हाऊस’ मध्ये १० दिवस मुक्कामाचे आमिष दाखवून नागरिकाची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून विविध बँक खात्यांचा आणि ऑनलाइन व्यवहारांचा तपास सुरू आहे.

 

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला सोशल मीडियावरून संपर्क साधत ‘व्हिला/गेस्ट हाऊस’मध्ये स्वस्त दरात राहण्याची ऑफर देण्यात आली. विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम ट्रान्सफर करून घेतली. सुरुवातीला कमी रक्कम घेतल्यानंतर विविध कारणे सांगत अधिक पैसे उकळण्यात आले. अखेर एकूण सुमारे ४० लाख रुपये घेतल्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला.

तक्रार प्राप्त होताच पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. बँक व्यवहार, मोबाईल क्रमांक, IP अ‍ॅड्रेस आणि डिजिटल ट्रेलच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. त्यानुसार गुजरात आणि मध्यप्रदेश येथून चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये मोमील अतुलकुमार मोदी (24, रा. मेहसाणा, गुजरात), रवी प्रसाद जाट (21, रा. राजगड , मध्यप्रदेश), रुद्रपल चोहान (22, मध्यप्रदेश) आणि हंश वर्मा (19, रा. मुंबई ) यांचा समावेश आहे. आरोपी विविध बँक खात्यांद्वारे रक्कम फिरवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या गुन्ह्यात ‘करंट अकाउंट’ आणि ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर करून पैशांचा माग काढणे कठीण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सायबर पोलिसांच्या दक्षतेमुळे ही टोळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा ऑनलाइन ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी लिंक, ऑफर किंवा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, तसेच पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी खात्री करावी, असेही सांगण्यात आले आहे. तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.

हे सुद्धा वाचा : यवत पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोर जेरबंद

पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून दोन वेगवेगळ्या प्रकरणांत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. कारवाईची भीती दाखवून एका तरुणाकडून ४ लाख ८१ हजार रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. तर शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Pimpri chinchwad cyber police has busted a fraud gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.