Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फसवणुकीतील रक्कम अमेरिकेतून परत मिळवली, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांचे यश; उद्योजकाला मिळाले तब्बल…

भोसरी येथील एका उद्योजकाची ५६ लाख रुपयांची फसवणूक झाली. मात्र, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत ही सर्व रक्कम तक्रारदाराला परत मिळवून दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 08, 2026 | 12:13 PM
फसवणुकीतील रक्कम अमेरिकेतून परत मिळवली, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांचे यश; उद्योजकाला मिळाले तब्बल...

फसवणुकीतील रक्कम अमेरिकेतून परत मिळवली, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांचे यश; उद्योजकाला मिळाले तब्बल...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : भोसरी येथील एका उद्योजकाची ५६ लाख रुपयांची फसवणूक झाली. मात्र, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत ही सर्व रक्कम तक्रारदाराला परत मिळवून दिली आहे. अमेरिकेतील बँकेशी सातत्याने समन्वय राखून केलेली ही कारवाई सायबर गुन्हेगारीच्या जगात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

 

असा घडला प्रकार

भोसरी येथील ‘PHBB VALVES PVT LTD’ या कंपनीचे मालक संजय जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यांची कंपनी हार्डवेअर क्षेत्रातील काम करते. व्यवसायानिमित्त त्यांचे चीनमधील ‘Wenzhou Artech Machinery Technology’ या कंपनीशी व्यवहार चालतात. हीच संधी साधून अज्ञात सायबर चोरट्याने चीनमधील कंपनीच्या ईमेल आयडीशी साधर्म्य असलेला बनावट ईमेल आयडी तयार केला. चोरट्याने या बनावट ईमेलवरून जाधव यांना संदेश पाठवला. त्यामध्ये कंपनीचे बँक खाते बदलल्याचे सांगण्यात आले. नवीन खात्यावर तातडीने ५६ लाख रुपये पाठवण्याची सूचना केली. हा ईमेल खरा वाटल्याने जाधव यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी ५६ लाख रुपये सिटीझन बँक (यूएसए) मधील खात्यावर जमा केले.

पैसे पाठवल्यानंतर जाधव यांनी संबंधित चिनी कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. तेव्हा कंपनीने कोणतेही खाते बदलले नसल्याचे स्पष्ट केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी तातडीने ऑनलाइन तक्रार नोंदवली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बँकेला दिले सर्व तांत्रिक पुरावे

पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि त्यांच्या पथकाने अमेरिकेतील संबंधित बँक अधिकारी आणि नोडल ऑफिसर यांच्याशी सतत ईमेलद्वारे संपर्क ठेवला. सायबर पोलिसांनी बँकेला सर्व तांत्रिक पुरावे सादर केले. हा व्यवहार फसवणुकीचा असल्याचे पटवून दिले. पोलिसांनी केलेल्या या प्रभावी पाठपुराव्यामुळे अमेरिकेतील बँकेने ती रक्कम फ्रिज केली. आता ही पूर्ण ५६ लाखांची रक्कम तक्रारदार संजय जाधव यांच्या खात्यावर परत जमा झाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सायबर पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, रेणुका वाव्हळ, दीपक भोसले, विनायक म्हसकर, सोपान बोधवड आणि माधव आरोटे यांचा समावेश होता.

हे सुद्धा वाचा : झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी

Web Title: Pimpri chinchwad cyber police recovers fraudulent money from us bank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Pimpri Police

संबंधित बातम्या

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
1

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
3

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
4

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.