Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसृष्टीच्या फलकावर लघुशंका, शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप; दाम्पत्याला ठोकल्या बेड्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित स्मारक असलेल्या शिवसृष्टी बाहेरील सूचना फलकावर लघुशंका केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या दाम्पत्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2025 | 02:21 PM
शिवसृष्टीच्या फलकावर लघुशंका, शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप; दाम्पत्याला ठोकल्या बेड्या

शिवसृष्टीच्या फलकावर लघुशंका, शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप; दाम्पत्याला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पुणे : आंबेगाव बुद्रुक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित स्मारक असलेल्या शिवसृष्टी बाहेरील सूचना फलकावर लघुशंका केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या दाम्पत्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी (दि.३१) पहाटे हा प्रकार घडला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या कृत्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

अमोल अरुण कुलकर्णी (वय ५९, रा. धायरी) आणि त्यांची पत्नी स्नेहा अमोल कुलकर्णी (वय ५७) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्याचे नावे आहेत. याबाबत नयनाथ तुकाराम अमराळे (वय २३) यांनी तक्रार दिली आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अमोल हे सरकारी सेवेतून निवृत्त झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, तक्रारदार अमराळे हे त्यांच्या मित्रासह नवले ब्रिजहून निघाले होते. ते शिवसृष्टीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून जात असताना तेथे दोन चारचाकी वाहने उभी असल्याचे त्यांना दिसले. त्यातील एका गाडीशेजारी एक वयोवृद्ध पुरुष थेट सूचना फलकावर लघुशंका करत होते. तर त्यांच्यासोबत एक महिला शेजारी उभी होती. त्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधितांनी आपली ओळख सांगितली. हा सर्व प्रकार अमराळे यांनी मोबाइलमध्ये शूट केला. नंतर याची माहिती पोलिसांना दिली.

भारती विद्यापीठ पोलिसांनी अमोल कुलकर्णी यांच्यासह पत्नीला अटक केली. अमोल दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक शक्यता वर्तविली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी दाम्पत्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधीत दाम्पत्यांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांनाही अटक केली असून त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. – सावळाराम साळगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे.

Web Title: Police arrest couple for urinating on shiv srushtis plaque

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • Arrested News
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
1

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
2

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
3

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत
4

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.