Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पवनचक्क्यांची केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पाटण तालुक्यातील पवनचक्क्यांमधून तांब्याच्या तारांसह केबलची चोरी करणाऱ्या टोळीचा सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि पाटण पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2026 | 01:35 PM
पवनचक्क्यांची केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्क्यांची केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; 1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:

पाटण : पाटण तालुक्यातील पवनचक्क्यांमधून तांब्याच्या तारांसह केबलची चोरी करणाऱ्या टोळीचा सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि पाटण पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सडावाघापूर व वनकुसवडे (ता. पाटण) परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यातील केबल वायरच्या चोरीच्या घटना ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान घडल्या होत्या. या प्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील काही जण या चोरीत सामील आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रकाश निवृत्ती निकम (वय ३४), नवनाथ गुलाब कदम (वय २३) आणि पंकज आनंदा कदम (वय २५) (सर्व रा. जांभेकरवाडी, ता. पाटण) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून चोरीला गेलेल्या २६० किलो केबल वायरमधील तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा व पाटण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पूढील तपास सुरू आहे.

सदर कारवाईत पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर, रमेश गर्जे, रोहित फाणे, परीतोष दातीर, विश्वास शिंगाडे, चव्हाण, सदगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अतीष घाडगे, राजु मुलाणी, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, ओंकार यादव, अमित झेंडे, अजय जाधव, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, शिवाजी भिसे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, स्वप्नील शिंदे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, संकेत निकम, चालक शिवाजी गुरव व पाटण पोलीस स्टेशनचे अंमलदार आव्हाड, कदम, गुरव, मोरे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

हे सुद्धा वाचा : पुण्यात खळबळ! कॅबिनेट मंत्र्याच्या स्विय सहाय्यकाकडून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

Web Title: Police arrest gang involved in windmill cable theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • crime news
  • Patan News
  • Satara Police

संबंधित बातम्या

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
1

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
2

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
3

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
4

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.