पुण्यातील गँग वॉरने पुणे हे रात्रीच्या वेळी पूर्ण सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पुण्यातील कोथरूड परिसरात रात्री १ वाजता गाडीला साईड दिली नाही म्हणून निलेश घायवळ गँगच्या पाच जणांनी गोळीबार आणि एकावर कोयत्याने हल्ला केला. कोथरूड पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर गोळीबार करत एकाला जखमी केल. पोलीस स्टेशनच्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी गुंडांची धिंड काढत इथे कोणी भाई नाही म्हणत भर रस्त्यावर गुंडांना फिरवल.
गुंड म्हणतात आम्ही इथले भाई
आम्ही इथले भाई आहोत म्हणत निलेश घायवळ गैंगच्या गुंडांनी ३५ वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्या पायावर गोळ्या मारल्या तर वैभव साठे यावर कोयत्याने हल्ला केला. एका रात्रीत २० मिनिटांच्या फरकाने गँगने दोन हल्ले केल्याने नागरिक घाबरले होते. रात्री अपरात्री बाहेर पडलोत तर आम्ही इथले भाई म्हणून गुंड मारणार का? हा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांना धीर देण्यासाठी घाबरून जाऊ नका यासाठी पोलिसांनी धिंड काढली. ज्यांची दिंड काढली त्यांचे नाव गुंड मयूर कुंबरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक आणि आनंद चाळेकर याचा समावेश आहे .
कोण आहे निलेश घायवळ
पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रात वचक निर्माण करण्यासाठी निलेश घायवळ गँग सक्रिय आहे. गजा मारणे आणि निलेश घायवळ टोळीत अनेक दिवसांपासून वैर आहे. एकमेकांचा बदला घेण्यासाठी गुन्हे सातत्याने घडत असतात. निलेश घायवळ टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी हल्ला केल्यावर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. निलेश घायवळ सारख्या गुंडाला राजकीय आश्रय असल्याची ही टीका केली होती. मात्र पोलिसांनी या घटनेत गुंडांना ताब्यात घेत त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढली.
पोलीस आयुक्त काय म्हणाले ?
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केल आहे. पुण्यात कोणतीही गँग नाही, जर गुन्हा करण्याचा प्रयत्न केला तर सात जन्म लक्षात राहील अशी कारवाई करणार. गुन्हा करण्याआधी विचार करा पोलीस सोडणार नाहीत.
गजा मारणे गॅंगशी संबंध
2000 ते 2003 या काळात घायवळची भेट गजानन मारणे याच्याशी झाली. दोघांनी मिळून एका खुनाची घटना घडवली आणि सात वर्षांची शिक्षा भोगली. जेलमधून सुटल्यानंतर घायवळ आणि गजा मारणे यांच्यात आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यामुळे दोघांमध्ये वैराचे नाते तयार झाले.
कारागिरानेच लावला सराफा व्यावसायिकांना चुना; तब्बल 129 ग्रॅम सोने घेऊन झाला पसार