Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अडीच काेटींची रक्कम काेणाची? सराफाच्या गाडीवरील दरोड्याचे गूढ उकलेना

मोरबगी (ता. जत) येथे सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून दहा लाखाच्या मुद्देमाल लंपास करणाऱ्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2025 | 02:36 PM
अडीच काेटींची रक्कम काेणाची? सराफाच्या गाडीवरील दरोड्याचे गूढ उकलेना

अडीच काेटींची रक्कम काेणाची? सराफाच्या गाडीवरील दरोड्याचे गूढ उकलेना

Follow Us
Follow Us:

सांगली : मोरबगी (ता. जत) येथे सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून दहा लाखाच्या मुद्देमाल लंपास करणाऱ्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीकडून मात्र २ कोटी ४९ लाख ८८ हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. मिळालेली अडीच कोटीची रोकड नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

दरोडेखोरांच्या टोळीतील संशयित रवी तुकाराम सनदी (वय ४३, रा. माळी वस्ती उमदी), अजय तुकाराम सनदी (वय ३५, रा. माळी वस्ती, उमदी, सध्या रा. गोकुळ पार्क, विजयपूर), चेतन लक्ष्मण पवार (वय २०, इंडी रस्ता, विजयपूर), लालसाब हजरत होनवाड (वय २४), आदिलशाह राजअहमद अत्तार (वय २७, रा. उमदी), सुमित सिद्धराम माने (वय २५, रा. पोखर्णी, ता. उत्तर सोलापूर), साई सिद्धू जाधव (वय १९, रा. उमदी) या सात जणांना अटक केली आहे. त्यांना सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या तपासाबाबत अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, उमदी (ता. जत) येथील सराफ अनिल अशोक कोडग हे दिनांक १४ रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास चालक सिद्धू जाधव याला घेऊन विजयपूर येथे निघाले होते. मोरबगी येथील पुलाजवळ दरोडेखोरांच्या टोळीने मोटार अडवून शस्त्राचा धाक दाखवला. दोघांना मोटारीतून बाहेर काढले. मारहाण करत सोन्याची अंगठी, तीन लाखाची रोकड, साडे सहा लाखाची मोटार, तीन हजाराचा मोबाईल असा सुमारे दहा लाखाचा ऐवज घेऊन पलायन केले. कोडग यांनी याबाबत उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या दरोड्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण व उमदी पोलिसांचे पथक तयार केले.

तांत्रिक माहिती व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून तीन संशयित कोंत्येवबोबलाद (ता. जत) येथील विजयपूर रस्त्यावरील झेंडे वस्तीवर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रवी सनदी, अजय सनदी, चेतन पवार या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर मोरबगी गावाजवळ सराफाला लुटल्याची कबुली दिली. या दरोड्यातील आणखी काही संशयित उमदी येथील चडचण रस्त्यावरील माळावर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन लालसाब होनवाड, आदिलशाह अत्तार, सुमित माने, साई जाधव या चौघांना अटक केली. त्यांनी दरोड्याची कबुली दिली.

गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक नितीन सावंत, पंकज पवार, उमदीचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे, सायबरच्या सहायक निरीक्षक रूपाली बोबडे, उपनिरीक्षक बंडू साळवे, कर्मचारी नागेश खरात, अनिल कोळेकर, महादेव नागणे, सागर टिंगरे, अमर नरळे, सतीश माने, सागर लवटे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, आमसिद्ध खोत, संदीप नलावडे, उदय माळी, सोमनाथ गुंडे, शिवाजी शिद, गणेश शिंदे, संतोश माने, कपिल काळेल, आगतराव मासाळ, साेमनाथ पोटभरे, इंद्रजित घोदे, कावेरी मोटे, म्हेत्रे, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आयकर विभागाकडून चौकशी

अधीक्षक घुगे म्हणाले, फिर्यादी कोडग यांनी तीन लाखाची रोकड लुटल्याची तक्रार दिली होती. प्रत्यक्षात तपासात २ कोटी ४९ लाख ८८ हजार रूपये मिळाले. या रकमेबाबत फिर्यादी व संशयितांनी कोणतेही विवरण दिले नाही. त्यामुळे आयकर विभागाला माहिती दिली आहे. त्यांची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासानुसार याच गुन्ह्यातील रोकड असण्याची शक्यता आहे.

‘लाईव्ह लोकेशन’च्या आधारे दरोडा

सराफ कोडग यांच्या चालकाचा मुलगा साई जाधव याला त्याचे वडील मोटारीतून पैसे घेऊन जातात, याची माहिती होती. त्याने कोडग यांचे ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवले होते. त्यानुसार त्यांनी पुलावर पाळत ठेवून दरोडा टाकल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

कर्नाटकात जाऊन घराची घेतली झडती

संशयितांची चौकशी करताना अजय सनदी याने चोरीचा मुद्देमाल विजयपूर येथील घरात ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने कर्नाटकात जाऊन सनदीच्या घराची झडती घेतली. तेव्हा बेडमध्ये तब्बल २ कोटी ४९ लाख ८८ हजार रूपये मिळाले. सराफ कोडग यांची मोटारही जप्त केले.

आणखी रोकडची शक्यता

दरोडा टाकणाऱ्या टोळीकडून आणखी रोकड मिळण्याची शक्यता आहे. टोळीने पूर्व नियोजित कट रचून दरोडा टाकला आहे. पोलिस कोठडीतील तपासात त्यांची कसून चौकशी केली जाईल, असे पाेलिसांनी सांगितले.

Web Title: Police have arrested a gang of seven people who robbed a bullion merchants car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • Arrested
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • sangli police

संबंधित बातम्या

सांगली पोलिसांची मोठी कारवाई; २.१५ कोटींचा गांजा-कोकेन वैज्ञानिक पद्धतीने नष्ट
1

सांगली पोलिसांची मोठी कारवाई; २.१५ कोटींचा गांजा-कोकेन वैज्ञानिक पद्धतीने नष्ट

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’
2

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…
3

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप
4

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.