Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेकडे 10 लाखांची खंडणी मागणाऱ्याला ठोकल्या बेड्या; कोल्हापुरातून घेतले ताब्यात

चोरीचा मोबाईल आणि सिमकार्ड वापरून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने, इचलकरंजी, कोल्हापूर येथून अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल आणि तीन सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 29, 2025 | 11:47 AM
महिलेकडे 10 लाखांची खंडणी मागणाऱ्याला ठोकल्या बेड्या; कोल्हापुरातून घेतले ताब्यात

महिलेकडे 10 लाखांची खंडणी मागणाऱ्याला ठोकल्या बेड्या; कोल्हापुरातून घेतले ताब्यात

Follow Us
Follow Us:

पिंपरी : चोरीचा मोबाईल आणि सिमकार्ड वापरून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने, इचलकरंजी, कोल्हापूर येथून अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल आणि तीन सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई रविवारी (दि. २७) करण्यात आली आहे. पार्थ किरण काकडे (२३, रा. कुडचे मळा, इचलकरंजी, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ऋषिकेश ऊर्फ सोनू वराळे (रा. कामगार चाळ, इचलकरंजी, कोल्हापूर) आणि त्यांचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तळेगाव येथील महिलेला फोन करून “तुमच्या पतीचा खून झाला तसाच तुमच्या मुलालाही त्रास देईन” अशी धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण गंभीर असल्याने उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना तातडीने आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाने मोबाईल आणि सिमच्या तांत्रिक विश्लेषणावर आधारित तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुख्य आरोपी पार्थ किरण काकडे यास कामगार वसाहत, इचलकरंजी, कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याने त्याचा मित्र ऋषिकेश ऊर्फ सोनू वराळे (रा. कामगार चाळ, इचलकरंजी) आणि आणखी तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने खंडणीसाठी कॉल केला होता, असे कबूल केले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल आणि तीन सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहे.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, सहायक निरीक्षक सुमिल कानगुडे, पोलिस अंमलदार प्रदीप पोटे, प्रदीप गोंडाबे, किरण जाधव, किरण काटकर, किशोर कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Police have arrested a man who demanded ransom from a woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Arrested
  • Arrested News
  • cmomaharashtra
  • crime news
  • Pimpri Crime

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.