Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीतील 47 तोळे सोने चोरीचा लागला छडा; टोळीच्या म्होरक्याला बीडमध्ये ठोकल्या बेड्या

सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून चोरट्यांच्या टोळीतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 17, 2025 | 12:25 PM
सांगलीतील 47 तोळे सोने चोरीचा लागला छडा; टोळीच्या म्होरक्याला बीडमध्ये ठोकल्या बेड्या

सांगलीतील 47 तोळे सोने चोरीचा लागला छडा; टोळीच्या म्होरक्याला बीडमध्ये ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह देशभरात चोरीच्या घटना वाढल्या
  • सांगलीतील ४७ तोळे सोने चोरीचा लागला छडा
  • टोळीतील म्होरक्याला बीडमधून ठोकल्या बेड्या

आष्टी : राज्यासह दजेशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यात भरदिवसा घरफोड्या करून तब्बल ४७ तोळे सोने चोरून नेल्याच्या घटना घडल्या हाेत्या. सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून या टोळीतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीत भरदिवसा तीन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आष्टी तालुक्यातील कासारी येथील संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले (वय २५) हा असल्याचे उघड झाले आहे. सांगली आणि बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला बीडमधून अटक केली आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीत भरदिवसा तीन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आष्टी तालुक्यातील कासारी येथील संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले (वय २५) हा असल्याचे निष्पन्न झाले. सांगली पोलिसांच्या पथकाने १०० किलोमीटरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी केली, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिलेने आरोपींना ओळखले आणि त्यांच्या दुचाकीच्या नंबरवरून आरोपींचा माग काढला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या (मोहन भोसला) दुसऱ्या आरोपीने घरफोड्यांची कबुली दिल्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ आष्टी तालुक्यात दाखल झाले.

कासारीतील पारधीवस्तीवर छापा

मंगळवारी (दि.१४) रात्री आष्टी पोलिसांची मदत घेऊन सांगली पोलिसांनी कासारी येथील पारधीवस्तीवर छापा टाकला. अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेल्या या कारवाईत संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले याला त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकण्यात आल्या. या टोळीतील तिसरा साथीदार अतुल नवनाथ भोसले हा अद्याप फरार आहे.

तीन घरफोड्यांत ४७ तोळे सोने चोरीला

तीन घरफोड्यांत तब्बल ४७ तोळे सोने चोरीला गेले होते. आष्टीचे पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांच्यासह प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. फरार आरोपीचा पोलिस शाेध घेत आहेत.

Web Title: Police have arrested a thief who broke into houses and stole gold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Theft Cases

संबंधित बातम्या

माजी खासदार संजय पाटलांसह 13 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

माजी खासदार संजय पाटलांसह 13 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

धक्कादायक ! प्रेयसीचा गळा दाबून विवाहित प्रियकराने केला खून; पत्नीचीही मिळाली साथ, आधी खून केला अन् तोच मृतदेह…
2

धक्कादायक ! प्रेयसीचा गळा दाबून विवाहित प्रियकराने केला खून; पत्नीचीही मिळाली साथ, आधी खून केला अन् तोच मृतदेह…

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ‘या’ परिसरात सापळा रचून तिघांना पकडले
3

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ‘या’ परिसरात सापळा रचून तिघांना पकडले

सासपडे हत्या प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जाणार; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती
4

सासपडे हत्या प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जाणार; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.