Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एटीएममध्ये पैसे भरताना तोंडावर स्प्रे मारून चोरी; पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या

एटीएममध्ये पैसे भरताना एका व्यक्तीच्या तोंडावर स्प्रे मारुन त्यांच्याकडील कॅश घेऊन पळून गेलेल्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात डी. एन नगर पोलिसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2025 | 01:36 PM
एटीएममध्ये पैसे भरताना तोंडावर स्प्रे मारून चोरी; पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या

एटीएममध्ये पैसे भरताना तोंडावर स्प्रे मारून चोरी; पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : एटीएममध्ये पैसे भरताना एका व्यक्तीच्या तोंडावर स्प्रे मारुन त्यांच्याकडील कॅश घेऊन पळून गेलेल्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात डी. एन नगर पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. प्रविण गोपाल, श्रीराम मुर्गन, अर्जुन विघ्नेश वेलू, गणेश लोकेश आणि अनिलकुमार इलमलाई अशी या पाच जणांची नावे असून, ते सर्वजण बॅंगलोरचे रहिवाशी आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी एक मोबाईल, दहा लाखांची कॅश, आणि गुन्ह्यांत वापरलेले दोन बाईक जप्त केले आहेत. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील स्थानिक कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींच्या चौकशीतून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राकेश संपतलाल पटेल हे अंधेरीतील अपना बाजार जवळ राहतात. बुधवारी १९ मार्चला सकाळी सव्वासहा वाजता ते अंधेरीतील जे. पी रोडवर असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आले होते. एटीएममध्ये पैसे भरत असताना अचानक तिथे काही तरुण आले. काही कळण्यापूर्वीच त्यापैकी एका तरुणाने त्यांच्या तोंडावर स्प्रे मारुन त्यांच्याकडील ७७ हजाराची कॅश असलेली बॅग चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर राकेश पटेल यांनी डी. एन नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंछर यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

या माहितीनंतर पळून गेलेल्या पाचही आरोपींना खेडच्या शिवापूर येथून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपींकडून सुमारे दहा लाखांची कॅश, एक मोबाईल आणि गुन्हयांतील दोन्ही बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणल्यानंतर अंधेरीतील स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पाचही आरोपी बॅंगलोरच्या आरटीनगर, चामुंडीनगर, हाटीनगरख्या मलाराम पाड्याचे रहिवाशी आहे. गुन्हा करण्यासाठी ते सर्वजण मुंबईत येत होते. गुन्हा केल्यानंतर ते ट्रॅव्हल्स बसमधून पुन्हा बॅंगलोरला पळून जात होते. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Police have arrested and taken action against a gang that stole cash nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! दोन लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ; गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकून मारहाणही केली अन्…
1

धक्कादायक ! दोन लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ; गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकून मारहाणही केली अन्…

Devendra Fadnavis: गुंड निलेश घायवळ प्रकरणात CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले…
2

Devendra Fadnavis: गुंड निलेश घायवळ प्रकरणात CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले…

किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्…; शिरुरमधील घटनेने खळबळ
3

किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्…; शिरुरमधील घटनेने खळबळ

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले
4

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.