Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जणांना घेतले ताब्यात

मुरगुड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2025 | 02:38 PM
टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जणांना घेतले ताब्यात

टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जणांना घेतले ताब्यात

Follow Us
Close
Follow Us:
  • शिक्षण क्षेत्रात खळबळ
  • टीईटी पेपर फोडण्याचा प्रयत्न
  • नऊ जणांना घेतले ताब्यात
कोल्हापूर : मुरगुड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुरगुड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये आज शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सुरू आहे. आज राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी शिक्षक परीक्षा देत आहेत. अनेक केंद्रावर ही परीक्षा अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे.

आरोपीमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही सहभाग आहे. सर्व आरोपींना कागल तालुक्यातील सोनगे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले सर्व आरोपी कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत. काल सायंकाळपासून रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत असून, अजूनही संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, टीईटी परीक्षेत मराठी माध्यमाचे उमेदवार सर्वाधिक आहेत. आज परीक्षा देण्यासाठी असंख्य विधाथी केंद्रात आले होते. मराठीसाठी तीन लाख २७ हजार १३५, इंग्लिशमधून २८ हजार ४३७, उर्दू २५ हजार ९३५, हिंदी ९२ हजार ४२०, बंगाली माध्यमातून १६८, कन्नड १४६८, तेलगू ३०, गुजराथी ७५ आणि सिंधी माध्यमातून केवळ एका उमेदवाराने नोंदणी केली आहे. तसेच राज्यातून ५२२८ दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली आहे. तसेच ४११ दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविण्यात आला आहे. माजी सैनिक असलेले ४५ उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षेनंतर ४५ दिवसात टीईटीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केलं आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. राज्यभरातून एकूण चार लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी अर्ज केला आहे. यंदा सर्वाधिक नोंदणी पुणे, नाशिक आणि नांदेड या जिल्ह्यांतून झाली आहे.

Web Title: Police have arrested the accused who were preparing to crack tet papers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • kolhapur

संबंधित बातम्या

Kolhapur News : कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; कराडमध्ये व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक
1

Kolhapur News : कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; कराडमध्ये व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

धक्कादायक ! पोटच्या मुलाकडून बापाची हत्या; घरातच पुरला होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्…
2

धक्कादायक ! पोटच्या मुलाकडून बापाची हत्या; घरातच पुरला होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्…

चालक ते टोळीप्रमुख, कारागृहात कातिल सिद्धीकीचा खून; वाचा शरद मोहोळचा गुन्हेगारी इतिहास
3

चालक ते टोळीप्रमुख, कारागृहात कातिल सिद्धीकीचा खून; वाचा शरद मोहोळचा गुन्हेगारी इतिहास

Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या
4

Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.