Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पसार झालेल्या रिक्षा चालकाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

ज्येष्ठ नागरिकाला जखमी अवस्थेत खडकीतील लोहमार्गाजवळील झाडीत टाकून पसार झालेल्या रिक्षाचालकाला अखेर दिल्लीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 10, 2025 | 12:30 AM
पसार झालेल्या रिक्षा चालकाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

पसार झालेल्या रिक्षा चालकाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Close
Follow Us:
  • रिक्षा चालकाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या
  • बाणेर पोलिसांनी मोठी कारवाई
  • ज्येष्ठ नागरिकाला दिली होती धडक
पुणे : बाणेरमधील रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची बतावणी करुन त्यांना जखमी अवस्थेत खडकीतील लोहमार्गाजवळील झाडीत टाकून पसार झालेल्या रिक्षाचालकाला अखेर दिल्लीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जखमी ज्येष्ठाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करुन पाच महिन्यांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. बाणेर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अखेर त्याला पकडले.

इसाराईल मंगला गुर्जर (वय २२, सध्या रा. महिपालपूर, दिल्ली, मूळ रा. नौनेर, अमरोही, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव व त्यांच्या पथकाने केली आहे.

बाणेरमधील बालेवाडी फाटा चौकात (दि. २० जुलै) रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठाला रिक्षाने धडक दिली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर नागरिक घटनास्थळी जमल्याने रिक्षाचालक गुर्जरने ज्येष्ठाला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जातो, अशी बतावणी केली. तेथून नागरिकाला रिक्षात घालून सुटका करुन घेतली. मात्र, गंभीर जखमी ज्येष्ठाला रुग्णलायात उपचारासाठी दाखल न करता गुर्जरने रिक्षा गणेशखिंड रस्तामार्गे खडकीतील रेंजहिल्स परिसरात नेली. लोहमार्गाजवळील दाट झाडीत जखमी अवस्थेतील ज्येष्ठाला सोडून गुर्जर पसार झाला.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने ते बेपत्ता झाल्याची तक्रार बाणेर पोलिसांत दिली. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह खडकी येथील लोहमार्गाजवळ सापडला. त्यांच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटविली. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा ज्येष्ठ नागरिकाला रिक्षाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. रिक्षाचालकाने त्यांना रिक्षातून उपचारासाठी रुग्णालयात नेले होते, अशी माहिती मिळाली. सीसीटीव्ही पडताळून पोलिसांनी तपास सुरू केला.

रिक्षाचालक दिल्लीतील महिपालपूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाणेर पोलिसांचे पथक तेथे गेले. महिपालपूर परिसरात आठ दिवस रिक्षाचालक गुर्जरचा शोध घेला. त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले. गुर्जरला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Police have arrested the rickshaw driver who fled after the accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Accident Case
  • Arrested News
  • crime news

संबंधित बातम्या

सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू
1

सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
2

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

Navi Mumbai : 42 हजाराचं लाच प्रकरण, पालिकेचे उपायुक्त निलंबित, नव्या अधिकाऱ्याकडे जाणार का पदभार?
3

Navi Mumbai : 42 हजाराचं लाच प्रकरण, पालिकेचे उपायुक्त निलंबित, नव्या अधिकाऱ्याकडे जाणार का पदभार?

Yusuf Pathan News: खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक; मेहुण्यालाही ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?
4

Yusuf Pathan News: खासदार युसूफ पठाणच्या सासऱ्याला पोलिसांनी केलं अटक; मेहुण्यालाही ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.