Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शितल पेट्रोल पंपाजवळील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; टँकर चालकाबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

काळेपडळ येथील क्लाऊड नाईन सोसायटीज‌वळ घडलेल्या टँकर व दुचाकीच्या अपघातप्रकरणात पोलिसांनी टँकर चालकासह टँकर मालकाला अटक केली आहे. चालक दारूच्या नशेत टँकर चालवित होता.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 08, 2026 | 12:30 AM
शितल पेट्रोल पंपाजवळील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; टँकर चालकाबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

शितल पेट्रोल पंपाजवळील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; टँकर चालकाबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात अपघातामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. काळेपडळ येथील क्लाऊड नाईन सोसायटीज‌वळ घडलेल्या टँकर व दुचाकीच्या अपघातप्रकरणात पोलिसांनी टँकर चालकासह टँकर मालकाला अटक केली आहे. चालक दारूच्या नशेत टँकर चालवित होता. त्यामुळे हा अपघात झाला व यात १९ वर्षीय तरुणाला मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

टँकर मालक नितीन मधुकर ननावरे (वय ४६, रा. कोणार्कपुरम सोसायटी) तसेच चालक रवींद भीमराव दनाने (वय ३४) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या अपघातात आरिज एजाज शेख (वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांत गुन्हा नोंद आहे. टँकर नितीन ननावरे याचा आहे. तर, रवींद्र दनाने त्यावर चालक म्हणून काम करत होता. पण, रवींद्र याला दारूचे व्यसन आहे. ही गोष्ट मालक नितीन याला माहिती होती. तरीही त्याने त्याला नोकरीस ठेवले आणि त्याच्या ताब्यात टँकर देखील चालविण्यास दिला.

दरम्यान, घटनेच्या दिवशी रवींद्र हा दारू पिऊन टँकर चालवित शीतल पेट्रोल पंपाजवळून जात होता. तेव्हा दुचाकीस्वार आरिज हा तेथून जात असताना रवींद्र याने त्याच्या दुचाकीला पाठिमागून धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला. पोलिसांनी प्रथम रवींद्र याला अटक केली. चौकशीनंतर त्याला दारूचे व्यसन असल्याचे तसेच अपघाताच्यावेळी देखील तो दारू पिला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी टँकर मालक नितीन ननावरे यालाही जबाबदार धरत अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा : टंचाईत सासवडला गराडे अन् घोरवडी धरणातून पाणी देऊ नका; आढावा बैठकीत पंचायत समिती सदस्यांची मागणी

​ओतूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना!

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मोनिका चौकात शुक्रवारी सकाळी ट्रक आणि स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका २८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. स्नेहल रवींद्र अहिनवे (रा. अहिनेवाडी, ता. जुन्नर) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शुक्रवारी (दि. ३) सकाळी ११: २० ते ११:३० च्या सुमारास स्नेहल अहिनवे या आपल्या सासऱ्यांसोबत स्कुटीने मोनिका चौकातून जात होत्या. यावेळी कल्याणकडून ओतूरकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रकने स्कुटीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, स्कुटीच्या मागील सीटवर बसलेल्या स्नेहल या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि दुर्दैवाने ट्रकचे पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत स्नेहल यांना जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ​

Web Title: Police have arrested the tanker owner and driver in connection with the accident near sheetal petrol pump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Accident News
  • Arrested News
  • crime news

संबंधित बातम्या

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप
1

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
2

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
3

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
4

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.