Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट सोन्याचा व्यवहार उघडकीस; फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना ठोकल्या बेड्या

बनावट सोन्याची बिस्किटे विक्रीस आणून तब्बल ५० लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कराड शहर परिसरातील गजानन हौसिंग सोसायटी येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2025 | 06:22 PM
बनावट सोन्याच्या व्यवहार उघडकीस; फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना ठोकल्या बेड्या

बनावट सोन्याच्या व्यवहार उघडकीस; फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

कराड : राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. फसवणुकीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बनावट सोन्याची बिस्किटे विक्रीस आणून तब्बल ५० लाखांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कराड शहर परिसरातील गजानन हौसिंग सोसायटी येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

बनावट सोन्याच्या व्यवहाराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. एका सोनाराने दाखवलेली सतर्कता व पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे तीन जणांना पोलिसांनी पकडले आहे. गोविंद एकनाथराव पदातुरे (रा. अहमदपूर, जि. लातूर), सर्जेराव आनंदा कदम (रा. पिसाद्री, कोल्हापूर) व अधिक आकाराम गुरव (रा. म्हासुर्णे, खटाव) अशी याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आसिफ अकबर मुल्ला हे शहरातील मुजावर कॉलनीत राहण्यास असून त्यांचे ‘रॉयल ज्वेलर्स’ नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास एकजण दुकानात आला. त्याने त्याचे नाव गोविंद पदातुरे असल्याचे सांगून, माझ्याकडे चोवीस कॅरेटचे ५०० ग्रॅम शुद्ध सोने आहे, ते मला विकायचे असल्याचे सांगितले. पदातुरे याने त्याच्याकडील बिस्किटांपैकी एक बिस्कीट पांढर्‍या प्लास्टिक पिशवीतून काढून आसिफ मुल्ला यांना दाखवले. हे बिस्किट पाहताक्षणीच खरे वाटल्याने मुल्ला यांना संशय आला. त्याचवेळी गोविंदने आपल्या मित्राच्या घरी गजानन हौसिंग सोसायटी येथे व्यवहार करू, असे सुचवले. असिफ मुल्ला यांना संशय आल्यामुळे त्यांनी गोविंदची नजर चुकवून कराड शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी मोमीन यांना याबाबत माहिती दिली.

गजानन हौसींग सोसायटीत सापळा रचला

पोलिसांनी तातडीने याची दखल घेत उपनिरीक्षक सांडगे यांना कारवाईसाठी पाठवले. असिफ मुल्ला गोविंदसोबत गजानन हौसींग सोसायटी येथे गेले. त्याठिकाणी सर्जेराव कदम व अधिक गुरव उपस्थित होते. तीन जणांनी मिळून बनावट सोन्याच्या १० बिस्किटांचा व्यवहार सुमारे ५० लाख रुपयांना रोख रक्कमेत करण्याची बोलणी सुरू केली. याचवेळी पोलिस निरीक्षक निलेश तारु, उपनिरीक्षक निखिल मगदुम, पोलीस नाईक संतोष पाडळे, शिपाई अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, मुकेश मोरे, संग्राम पाटील यांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले.

बनावट ११ बिस्किटे सापडली

पंच आणि सोनार यशवंत देवकर यांच्या उपस्थितीत तिघांची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये त्यांच्या खिशातून बनावट सोन्याची ११ बिस्किटे सापडली. पोलिसांनी गोविंद पदातुरे, सर्जेराव कदम आणि अधिक गुरव यांना ताब्यात घेतले असून, फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह पथक तपास करीत आहे.

Web Title: Police have arrested three people after uncovering fake gold transactions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 06:21 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Froud News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले
1

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
2

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार
3

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?
4

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.