Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवड्यात रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला महागात पडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2026 | 12:30 AM
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवड्यात रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला महागात पडले आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक, तसेच त्यांच्या मुलासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

या प्रकरणी माजी नगरसेवक किशाेर राजाराम विटकर (वय ५१), हर्षद किशोर विटकर (वय २८), गणेश पोपटराव ढोकळे (वय ४०), गणपत जिवराज पुरोहित (वय ५१), विकास मच्छिंद्र सोनवणे (वय ४०), रोहित मधुकर वैराळ (वय ३५, सर्व रा. येरवडा), रामेश्वर अरुण दुर्लेकर (वय ३२, रा. वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी बलजीत थोरात यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किशोर विटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, येरवड्यातील गाडीतळ परिसरात विटकर यांचे कार्यालय आहे. शुक्रवारी (२२ मे) कार्यालयासमोरील रस्त्यावर टेबल टाकून केक कापण्यात आला. विटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री एकच्या सुमारास आतषबाजी करण्यात आली. विटकर आाणि त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक शांततेता भंग केला, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे पोलिसंनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : बारामती पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद; तब्बल…

आंदेकर टोळीकडून वनराजच्या खुनातील आरोपींचे नातेवाईक टार्गेट

वनराज आंदेकर खूनानंतर वर्षपुर्तीच्यावेळीच आंदेकर टोळीकडून बदल्याच्या भावनेतून यातील सर्व आरोपींच्या नातेवाईकांना टार्गेट करण्यात आल्याचे समोर आलेले असताना या खूनांचे नियोजनही ‘त्या’ वर्षातच झाल्याचे वास्तव आता समोर येऊ लागले आहे. कारण, आयुष कोमकरच्या खूनापुर्वीच आंदेकर टोळीचा सदस्य आवेज खान हा पुणे पोलिसांच्या रडारवरून लपण्यासाठी उत्तरप्रदेशात जाऊन लपल्याचे समोर आले आहे. अक्षय म्हस्केच्या खूनासाठी तो तीन दिवसांपुर्वीच पुण्यात आला होता, असेही समोर आले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा १ सप्टेंबर २०२४ रोजी सोमनाथ गायकवाड याच्या टोळीकडून खून झाला. या खूनाने शहर तर हादरले होतेच पण आंदेकर टोळी पुर्ण हादरून गेली होती. पण, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला हा खून जिव्हारी लागला होता. तेव्हाच आंदेकर टोळीकडून मुलाच्या बदल्यात आरोपींचे नातेवाईक टार्गेट करण्यात आले असल्याचे सांगितले जात होते.

Web Title: Police have registered a case against a former ncp corporator in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • NCP News
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
1

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला
2

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…
3

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…

कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 
4

कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.