Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा, महिलेला स्वारगेटमधील लॉजवर बोलावले अन्…; आणखी एका भोंदूचा संतापजनक प्रकार

पुन्हा सांस्कृतिक शहरात आणखी एका भोंदूने अंगात दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 12, 2026 | 06:05 PM
अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा, महिलेला स्वारगेटमधील लॉजवर बोलावले अन्...; आणखी एका भोंदूचा संतापजनक प्रकार

अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा, महिलेला स्वारगेटमधील लॉजवर बोलावले अन्...; आणखी एका भोंदूचा संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : पुन्हा सांस्कृतिक शहरात आणखी एका भोंदूने अंगात दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आमिष दाखवून भोंदूने महिलेवर बलात्कार केला तसेच महिलेची ५० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी एका भोंदूविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमधील अशोक खरात तसेच पुण्यातील ऋषीकेश वैद्य प्रकरण ताजे असतानाच आणखी हे एक प्रकरण समोर आले आहे.

 

याप्रकरणी ओैंदुबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गडदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पतीशी पटत नव्हते. त्यांच्यात कौटुंबिक वाद झाले. त्यामुळे ती वेगळी राहत होती. महिलेची पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तीमार्फत गडदे याच्याशी ओळख झाली. तेव्हा गडदेने देवऋषी असल्याची बतावणी महिलेकडे केली. माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी त्याने केली. कौटुंबिक समस्या दूर करतो, असे सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढले.

महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने महिलेला माणगाव परिसरात बोलावून तेथील एका लॉजवर बलात्कार केला. महिलेला नोकरी तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आरोपी गडदेने तिच्याकडून वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. काही रक्कम रोख स्वरुपात घेतली तसेच महिलेकडून दागिने घेतले. गेले पाच ते सहा वर्ष हा प्रकार सुरू होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

गेल्याच आठवड्यात दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय ३९, रा. वसई, जि. पालघर) याला अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा : ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Web Title: Police have registered a case against a man for cheating a woman in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली
1

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

Crime News: मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश! २३ कोटींची मालमत्ता जप्त तर ९ जणांना DRI कडून अटक
2

Crime News: मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश! २३ कोटींची मालमत्ता जप्त तर ९ जणांना DRI कडून अटक

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!
3

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…
4

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.