Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई केली आहे. चार किलोपेक्षा अधिक गांजा जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2025 | 02:24 PM
तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:
  • तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई
  • चार किलोपेक्षा अधिक गांजा जप्त
  • एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तासगाव : तासगाव-आरवडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या चतुराईपूर्ण कारवाईत गांजाची मोठी खेप पकडण्यात आली आहे. हॉटेलच्या बाजूला संशयास्पदपणे उभ्या असलेल्या मोटारीसह एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चार किलोपेक्षा अधिक गांजा आणि आठ लाख रुपयांची मोटार असा तब्बल नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई केल्याने तासगावातील अमली पदार्थांच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे. पोलिस शिपाई विठ्ठल श्रीकांत सानप (वय ३३) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून, अटक केलेल्या संशयिताचे नाव सचिन आप्पासाहेब निकम (वय ३०, रा. निकम वस्ती, डोंगरसोनी, ता. तासगाव) असे आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक व्यक्ती मोटारीतून गांजाची विक्री करण्यासाठी आरवडे रस्त्याच्या दिशेने येत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचला. तपासादरम्यान एका हॉटेलजवळ उभी असलेली मोटार पाहून पोलिसांनी झडती घेतली असता, सचिन निकम हा त्यातच आढळला. त्याच्या मोटारीतून चार किलो तीनशे पाच ग्रॅम गांजा आढळून आला, ज्याची किंमत सुमारे १,०८,५०० रुपये इतकी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ८ लाख किंमतीची मोटार (क्र. MH 10 DB 5206) आणि गांजा असा एकूण ९ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तासगाव पोलिसांनी संशयिताची सखोल चौकशी सुरू केली असून, गांजा कोठून आणला आणि कोणाला विक्रीसाठी घेऊन जात होता याचा तपास गतीमान झाला आहे. या कारवाईचे नेतृत्व उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांनी केले.

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

गेल्या काही दिवसाखाली गांजा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना वानवडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत ही कारवाई करण्यात आली आहे. अविनाश श्रीरंग भोंडवे (वय ४१, रा. सिंहगड रोड) आणि संजय विश्वनाथ काथे (वय ३५, रा. वैदुवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक उमाकांत महाडिक, अमोल पिलाणे व महेश गाढवे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Police have taken major action against drugs in tasgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Arrested
  • crime news
  • Drugs News
  • Tasgaon Crime

संबंधित बातम्या

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर
1

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर

Ratnagiri : व्हेल माशाच्या उलटीची 3 कोटींची तस्करी ; आरोपींना अटक
2

Ratnagiri : व्हेल माशाच्या उलटीची 3 कोटींची तस्करी ; आरोपींना अटक

Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
3

Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Crime News: गंगापूरमध्ये पेट्रोल पंपावर सशस्त्र रॉबरी! पहाटेचा थरार, कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखून ऐवज केला लांबविला
4

Crime News: गंगापूरमध्ये पेट्रोल पंपावर सशस्त्र रॉबरी! पहाटेचा थरार, कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखून ऐवज केला लांबविला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.