Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील लॉजवर सुरू होता हा’ भलताच प्रकार; पोलिसांनी छापा मारला अन्…; वाचा संपूर्ण प्रकरण

नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. महिलेला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी लॉज चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2025 | 05:51 PM
पुण्यातील लॉजवर सुरू होता हा' भलताच प्रकार; पोलिसांनी छापा मारला अन्...; वाचा संपूर्ण प्रकरण

पुण्यातील लॉजवर सुरू होता हा' भलताच प्रकार; पोलिसांनी छापा मारला अन्...; वाचा संपूर्ण प्रकरण

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. महिलेला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी लॉज चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रकाश रामा शेट्टी (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष हेगडे, प्रज्योत हेगडे, ओम माने यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पोलीस शिपाई मयुरी नलावडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात असलेल्या साई लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. पोलिसांच्या पथकाने लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी लॉजमधून महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत लाॅज चालक शेट्टी व साथीदारांनी महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवयायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लाॅज चालक शेट्टी याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गु्न्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार तपास करत आहेत.

वेश्या व्यवसायावर येरवडा पोलिसांचा छापा

गेल्या काही दिवसाखाली कल्याणीनगर येथील निवासी भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर येरवडा पोलिसांनी छापा कारवाई केली अन् वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. कारवाईनंतर पोलीस अंमलदाराच्या तक्रारीवरून लॉजच्या मालकासह तिघांनी संगनमताने वेश्या व्यवसाय चालविल्याचे म्हटले. मात्र, असे असताना गुन्हा केवळ दोघांवर दाखल केला. यात मालक महिलेला आरोपी न केल्याने पोलीस दलात उलट-सुलट चर्चा सुरू असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करताना हात आखडता का घेतला, अशी चर्चा सुरू झाली आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याणीनगर येथे स्प्रिंग ब्रुक्स लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता.

Web Title: Police have taken major action by raiding a lodge in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित
1

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित

महाभयानक! बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी; पोलिसांनी सापळा रचून केली 4 जणांना अटक
2

महाभयानक! बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर तस्करी; पोलिसांनी सापळा रचून केली 4 जणांना अटक

अन्वेषणाचा नवा युग! महाराष्ट्र साहसी पर्यटन आराखड्याचे विश्लेषण; बंजी जंपिंगसारख्या खेळांना मोठी मागणी
3

अन्वेषणाचा नवा युग! महाराष्ट्र साहसी पर्यटन आराखड्याचे विश्लेषण; बंजी जंपिंगसारख्या खेळांना मोठी मागणी

Crime News: चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत खून प्रकरणाचा छडा; दोन आरोपी जेरबंद
4

Crime News: चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २४ तासांत खून प्रकरणाचा छडा; दोन आरोपी जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.