Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : आळेफाट्यात बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, एकाला अटक; तब्बल…

आळेफाटा परिसरात बेकायदा देशी दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी छापा टाकून ९६० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 03, 2026 | 12:30 AM
आळेफाट्यात बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, एकाला अटक; तब्बल...

आळेफाट्यात बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, एकाला अटक; तब्बल...

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : फुगेवाडीतील दारुकांडानंतर पुणे पोलिसांकडून अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरु आहे. अशातच आता आळेफाटा परिसरात बेकायदा देशी दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी छापा टाकून ९६० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एम. हिले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल आणि व्ही. डी. दहिफळे हे आळेफाटा चौक परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आळेफाटा येथील निंजा चायनीज दुकानाच्या मागील बाजूस एक व्यक्ती बेकायदा देशी दारूची विक्री करीत आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान एक व्यक्ती लाल रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीसह संशयास्पदरीत्या बसलेला आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव समाधान चत्रभुज गंभीरे (वय ४२, रा. चैतन्यनगर, आळेफाटा, ता. जुन्नर) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता १८० मिली क्षमतेच्या संत्रा जी.एम. कंपनीच्या १२ सिलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी ८० रुपये किंमतीच्या या बाटल्यांची एकूण किंमत ९६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा; पुणे- नाशिक महामार्ग रोखला

एक नमुना बाटली स्वतंत्रपणे सीलबंद

पंचांसमक्ष दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, रासायनिक विश्लेषणासाठी एक नमुना बाटली स्वतंत्रपणे सीलबंद करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालावर पंच व पोलिसांच्या स्वाक्षरीसह आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Police have taken major action by raiding illegal liquor sales in alephata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

2030 पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, 950 कोटींच्या प्रकल्पांना गती
1

2030 पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, 950 कोटींच्या प्रकल्पांना गती

‘समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना…’; मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली
2

‘समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना…’; मुख्यमंत्री फडणवीसांनी डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास ‘पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर’ ठरतील!’
3

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास ‘पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर’ ठरतील!’

Pune News: पुणेकरांसाठी गूड न्यूज! ‘या’ तीन मार्गांमुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार; गडकरी
4

Pune News: पुणेकरांसाठी गूड न्यूज! ‘या’ तीन मार्गांमुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार; गडकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.