Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कँटीनमध्ये 74 लाखांचा अपहार, हवालदाराला ठोकल्या बेड्या; ‘असा’ झाला प्रकार उघडकीस

पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता यावी, यासाठी सुरू केलेल्या ‌‘संस्कृती सबसिडीअर कँटीनमध्ये ७४ लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत समाेर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 04, 2025 | 01:44 PM
कँटीनमध्ये 74 लाखांचा अपहार, हवालदाराला ठोकल्या बेड्या; 'असा' झाला प्रकार उघडकीस

कँटीनमध्ये 74 लाखांचा अपहार, हवालदाराला ठोकल्या बेड्या; 'असा' झाला प्रकार उघडकीस

Follow Us
Close
Follow Us:
  • कँटीनमध्ये 74 लाखांचा अपहार
  • हवालदाराला ठोकल्या बेड्या
  • ‘असा’ झाला प्रकार उघडकीस
सांगली : पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता यावी, यासाठी सुरू केलेल्या ‌‘संस्कृती सबसिडीअर कँटीनमध्ये ७४ लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत समाेर आले आहे. याबाबत कॅन्टीन व्यवस्थापक, हवालदार भूपेश भीमराव चांदणे (वय ४२, रा. अयोध्यानगर, संजयनगर, सांगली) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. याबाबत पोलिस कल्याण शाखेचे तत्कालीन निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, तत्कालीन पोलिस निरीक्षक दिलीप सावंत यांनी साधारण दहा वर्षांपूर्वी पोलिसांसाठी कॅन्टीन सुरू केले होते. कॅन्टीनमध्ये स्वस्तात किराणा माल व वेगवेगळ्या वस्तू विक्री होत होत्या. त्यामुळे कॅन्टीनला चांगला प्रतिसाद मिळत होता. किराणा मालासह वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स वस्तूंची देखील विक्री होत होती. कॅन्टीनचा व्यवस्थापक असलेल्या हवालदार चांदणे याने साधारणपणे तीन वर्षांपासून कॅन्टीनमध्ये गैरव्यवहार सुरू केला.

लेखापरीक्षणात उघड झाला प्रकार

लेखापरीक्षक विश्वेश देशपांडे ॲन्ड कंपनीने एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या वर्षाचे लेखापरीक्षण केले. तेव्हा सुपरवायझर अकाऊंट कॅश आणि नफ्यात १९ लाख ८० हजारांची तफावत आढळली. स्टॉकमधील तफावत ४ लाख ४८ हजार रुपये, सुपरवायझर डेटर्समध्ये २० लाख ८० हजार रुपये अशी एका वर्षात ४५ लाख ८ हजार ७५५ रुपयांची तफावत आढळली. एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षात २८ लाख ९४ हजार ८१२ रुपयांची तफावत आढळून आली.

पोलिस कल्याण विभागास अहवाल सादर

दोन वर्षांत ७४ लाख ३ हजार ५६७ रुपयांची तफावत आढळल्याचा अहवाल लेखापरीक्षक देशपांडे यांनी पोलिस कल्याण विभागास दिला. पोलिस कल्याणचे तत्कालीन निरीक्षक कांबळे यांनी हा अहवाल पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला. अधीक्षक घुगे यांनी ३० मे २०२५ रोजी याबाबत चौकशीचे आदेश दिले. अधीक्षक घुगे यांनी व्यवस्थापक चांदणेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Police have taken major action in the case of fraud in the canteen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 01:44 PM

Topics:  

  • Arrested News
  • sangli news
  • sangli police

संबंधित बातम्या

पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?
1

पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?

शिक्रापूर पोलिसांनी माज उतरवला; गुंडांची त्यांच्या गावातूनच काढली धिंड
2

शिक्रापूर पोलिसांनी माज उतरवला; गुंडांची त्यांच्या गावातूनच काढली धिंड

सोनसाखळी हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचा ऐवज जप्त
3

सोनसाखळी हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचा ऐवज जप्त

कात्रजमधील ‘त्या’ तरुणाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
4

कात्रजमधील ‘त्या’ तरुणाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.