Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड; लोहगाव पोलीस ठाण्यात ‘एसीबी’ची मोठी कारवाई

अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजारांची लाच मागणाऱ्या लोहगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 03, 2026 | 01:46 PM
लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड; लोहगाव पोलीस ठाण्यात ‘एसीबी’ची मोठी कारवाई

लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड; लोहगाव पोलीस ठाण्यात ‘एसीबी’ची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजारांची लाच मागणाऱ्या लोहगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. लोहगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. मनोज मधुकर बरुटे (वय ३८, रा. गंगा सोसायटी, कळस, आळंदी रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी बरुटे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

 

मदत करण्यासाठी मागितली लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारादाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे पोलीस उपनिरीक्षक बरुटे यांनी सुरुवातीला ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. तक्रारदाराला लोहगाव पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी (१ मे) सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक बरुटे यांनी बोलाविले. तक्रारदाराक़डून ८० हजारांची लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे तपास करत आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

हे सुद्धा वाचा : पती-पत्नीमधील घटस्फोटानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तूफान राडा; लाकडी दांडके, कटरने जबर मारहाण

Web Title: Police sub inspector of lohgaon police station arrested for demanding bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Arrested News
  • Bribe News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल
1

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…
2

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
3

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव
4

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.