Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास पुढे सरकत असतानाच पोलिसांच्या हाती एकामागून एक नवे धागेदोरे लागत आहेत. मिरा रोडमधून तीन महिलांसह पाच जण ताब्यात, मुख्य संशयित पप्या शिंदेशी त्यांचा संपर्क आणि आता २३ अधिकाऱ्यांचे SIT पथक... या सगळ्यामुळे पूर्णेकर यांच्या हत्येमागील नेमके कारस्थान काय?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 01, 2026 | 04:03 PM
Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

Follow Us
Follow Us:
  • पूर्णेकर हत्या प्रकरणात ३ महिलांसह ५ जण ताब्यात
  • महिलांचा पप्या शिंदेशी संपर्क असल्याचा पोलिसांचा संशय
  • २३ अधिकाऱ्यांचे SIT पथक तपासात सक्रिय
 

ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास पुढे सरकत असतानाच पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागत आहेत. मिरा रोड परिसरातून तीन महिलांसह एकूण पाच जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तिन्ही महिलांचा मुख्य संशयित पप्या शिंदे याच्याशी संपर्क असल्याचा संशय असून, हत्येच्या कटात त्यांची काही भूमिका होती का, याचा तपास सुरू आहे.

पप्या शिंदेच्या संपर्कात असल्याचा संशय

पोलिसांच्या तपासात ताब्यात घेतलेल्या महिलांचा पप्या शिंदे याच्याशी संपर्क असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्णेकर आणि पप्या शिंदे यांच्यात पूर्वी जवळचे संबंध असल्याचेही तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या महिलांचा पूर्णेकर यांच्याशी काही जुना वाद होता का किंवा हत्येपूर्वी त्यांच्यात काही संपर्क झाला होता का, या दिशेने पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान, पप्या शिंदे याला या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली असून, तो पूर्णेकर यांचा पूर्वीचा जवळचा सहकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हल्ल्याच्या वेळी तो घटनास्थळी उपस्थित होता, अशीही पोलिसांची माहिती आहे.

हेही वाचा: Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच… 

२३ अधिकाऱ्यांचे SIT पथक तपासात

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरासिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तपास करत असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. पथकात सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांसह २३ अधिकारी असल्याचे सांगण्यात आले आहे. हत्येतील आरोपींची भूमिका निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि अन्य उपलब्ध पुराव्यांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी यापूर्वीच अनेक पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली आहेत.

राजकीय आरोपांमुळे प्रकरणाला वेगळे वळण

पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी माजी ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येच्या कटात सहभाग असल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुरवणी जबाबात दोघांची नावे घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी हे आरोप फेटाळले असून, आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पप्या शिंदेपासून ते नव्याने ताब्यात घेतलेल्या पाच जणांपर्यंत आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांपर्यंत तपासाचे धागे कोणत्या दिशेने जातात, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

ठाण्यात कडक बंदोबस्त

हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कारवाईची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पोलिस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी झाल्यानंतर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मीनाक्षी शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरही सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, हत्येमागील नेमका कट, आरोपींची भूमिका आणि इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग याचा तपास SITकडून सुरू आहे.

Web Title: Pradeep purnekar murder case three women five detained mira road papya shinde sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Murder News

संबंधित बातम्या

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई
1

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप
2

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
3

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…
4

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.