संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला (फोटो- सोशल मिडिया)
चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात दंगल, मारामारी आणि घरफोडीसह सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या गुन्ह्यांची माहिती आणि संबंधित पुरावे सरकारी अभियोक्ता ननावरे यांनी न्यायालयात सादर केले.
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरण; संतोष चव्हाणला कोर्टाने थेट…
गणेशोत्सवाच्या काळात डीजेला विरोध करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला करणे गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे समाजात द्वेषाची भावना निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या जगजीत सिंग विरुद्ध आशिष मिश्रा या निकालाचा दाखला देत, फिर्यादीची बाजू ऐकून न घेता तसेच त्याच्या सुरक्षेचा विचार न करता जामीन मंजूर करता येणार नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी सदाशिव पेठेतील टिळक रस्त्यावर ही घटना घडली. विद्यानंद सुहास बापट (वय ३७) यांनी याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बापट हे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना चव्हाण याने त्यांचा रस्ता अडविला. ‘तू आमच्या गणेशोत्सवात अडथळा निर्माण करतोस का? डीजेविरोधात बोलतोस का?’ असे म्हणत त्याने बापट यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे कृत्य योग्य नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विद्यानंद बापट यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे विद्यानंद बापट यांना पोलिस संरक्षण असणार आहे. याबाबत माहिती समोर आली आहे. विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर सरकारने वेगवान हालचाली केल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.






