सौजन्य - एआय
मंगळवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्याने उमेश उपचारासाठी लाल दवाखान्यात दाखल झाले होते. डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन आणि औषधे दिली. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने ते रुग्णालयाच्या परिसरातच विश्रांतीसाठी झोपले होते. दरम्यान, रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास त्यांचे पूर्वपरिचित असलेले दोन तरुण तेथे आले. त्यांनी उमेश गोस्वामी यांच्याकडे दारू पाजण्याचा आग्रह धरला. मात्र, त्यांनी दारू पाजण्यास स्पष्ट नकार दिला. याच कारणावरून दोघांना राग आला आणि त्यांनी जवळील कोयत्याने उमेश यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या खांद्याला, हाताला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर दोन्ही तरुण घटनास्थळावरून पसार झाले. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या उमेश यांना एका ऑटोचालकाने तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजापेठ पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणी वीर प्रफुल्ल शेळके आणि संदीप ऊर्फ मुन्ना राजू शिंदे (दोघेही रा. दसरा मैदान झोपडपट्टी) यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी उमेश गोस्वामी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, उपचारासाठी आलेल्या रुग्णावर रुग्णालय परिसरातच अशा प्रकारे हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. रुग्णालय परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक सुरक्षा व्यवस्था असण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राजापेठ पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
Ans: दारू पाजण्यास नकार दिल्याच्या रागातून दोन तरुणांनी उमेश गोस्वामी यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती आहे.
Ans: उमेश टेकचंद गोस्वामी (वय ५७, रा. सुशीलनगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
Ans: वीर प्रफुल्ल शेळके आणि संदीप ऊर्फ मुन्ना राजू शिंदे यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






