Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

पुण्यातील बिबवेवाडी हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने निकाल देत एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी शुभम भागवतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 17, 2025 | 03:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 2021 मध्ये 22 हून अधिक वार करून हत्या
  • आरोपी दोषी ठरवत न्यायालयाचा निकाल
  • मृत्युदंड न देता जन्मठेपेची शिक्षा
पुणे: पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू मुलीवर कोयता आणि चाकूने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. तब्बल चाकूने २२ वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल चार वर्षांनी हा निकाल सुनावण्यात आला. चार वर्षानंतर पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला आहे.

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक

शवविच्छेदन अहवालात एकूण २५ जखमा

ही घटना १२ ऑक्टोबर 2021 रोजी बिबवेवाडीतील एका लॉन्समध्ये घडली होती. आरोपीचं नाव शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत असे आहे. आरोपीने अत्यंत क्रूरपणे मुलीवर वार करून तिची हत्या केली होती. शवविच्छेदन अहवालात मृतदेहावर एकूण २५ जखमा आढळून आल्या होत्या. यामुळे हत्येची भीषणता स्पष्ट झाली.

युक्तिवादात काय?

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी जोरदार युक्तिवाद केला. युक्तिवादात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत अमानुष आणि समजला हादरवणारा असल्याचे त्याला मुर्त्युदंड देण्यात यावा अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती. समाजात कठोर संदेश जावा आणि अशा प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी फाशीची शिक्षा योग्य ठरेल असा युक्तिवाद त्यांनी केला. यासाठी साक्षीदारांच्या साक्षींसह उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधारही सादर करण्यात आला होता.

न्यायालयाने सरकारी तसेच बचाव पक्षाचे सर्व युक्तिवाद सखोलपणे ऐकून घेतले. हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि क्रूर स्वरूपाचा असला तरी तो ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ प्रकरणांच्या चौकटीत मोडतो का, याचा विचार करण्यात आला. भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अंतर्गत आरोपी दोषी ठरवण्यात आला. या कलमानुसार मृत्युदंड किंवा जन्मठेप अशी दोनच शिक्षांची तरतूद आहे.

निकाल देतांना न्यायालयाने काय म्हंटले?

निकाल देतांना न्यायालयाने म्हंटले “जन्मठेप हा नियम असून मृत्युदंड हा अपवाद आहे”. मृत्युदंड देऊन हा गुन्हा अपवादात्मक ठरवावा, असे न्यायालयाच्या न्यायिक मनाला पटत नाही. आरोपीसाठी जन्मठेप हीच योग्य शिक्षा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

या निक्कालवर सरकारी वकिलांनी काय दिली प्रतिक्रिया?

या निकालावर प्रतिक्रिया देताना विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हेमंत झंजाड म्हणाले की, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत. या निर्णयामुळे समाजातील विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. महिलांना कायद्याचा मजबूत आधार आहे, हे पुन्हा एकदा या निकालातून स्पष्ट झाले आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

पतीच्या प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन कुटुंबात राडा; महिलांसह अनेकजण जखमी, 14 जणांवर गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने हत्या कधी आणि कुठे केली?

    Ans: 12 ऑक्टोबर 2021 रोजी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात.

  • Que: न्यायालयाने कोणती शिक्षा सुनावली?

    Ans: भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत जन्मठेप.

  • Que: मृत्युदंड का देण्यात आला नाही?

    Ans: प्रकरण ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

Web Title: Pune crime a 15 year old kabaddi player was brutally murdered due to unrequited love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक
1

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक

Uttarpradesh Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधातून रक्तरंजित शेवट, विवाहित महिला इंजिनिअरची कुऱ्हाडीने हत्या; नेमकं प्रकरण काय?
2

Uttarpradesh Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधातून रक्तरंजित शेवट, विवाहित महिला इंजिनिअरची कुऱ्हाडीने हत्या; नेमकं प्रकरण काय?

Meerut Crime: प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, नंतर व्हिडीओ कॉल ट्रॅप; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि…
3

Meerut Crime: प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, नंतर व्हिडीओ कॉल ट्रॅप; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि…

Palghar News: ग्रामपंचायतच्या ना-हरकत दाखल्यासाठी 20 हजारांची मागणी, ग्रामविकास अधिकाऱ्याला ACB कडून  रंगेहात अटक
4

Palghar News: ग्रामपंचायतच्या ना-हरकत दाखल्यासाठी 20 हजारांची मागणी, ग्रामविकास अधिकाऱ्याला ACB कडून रंगेहात अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.