पतीच्या प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन कुटुंबात राडा; जोरदार हाणामारी, तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : पतीच्या प्रेम प्रकरणाच्या संशयातून दोन कुटुंबामध्ये वाद होऊन तूफान हाणामारी झाली. या मारहाणीत महिलांसह दोन्ही बाजूंचे सदस्य जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन सिटीचौक पोलिस ठाण्यात महिलांसह तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देविका विजय फुलारे (रा. रिलायन्स मॉलच्या मागे, गजानन मंदीर रोड), सोनाली कापसे, गायत्री कापसे, कल्पना कापसे, राजेंद्र कापसे, वाल्मिक कापसे, शामराव कापसे, सुमित फुलारे, अरुणा गवळी (रा. धनमंडी, जुनाबाजार), तिचा मुलगा व त्याचे मित्र प्रेम, सागर, महेश घट्टे, युवराज अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हेदेखील वाचा : Meerut Crime: प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, नंतर व्हिडीओ कॉल ट्रॅप; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि…
या प्रकरणात अरुणा ज्ञानेश्वर गवळी (वय ४०, रा. धनमंडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास देविका फुलारे व तिचे साथीदार फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने शिरले. यावेळी फिर्यादीला केस ओढून, हातपाय धरून मारहाण करण्यात आली. भांडण सोडविण्यास आलेल्या फिर्यादीच्या मुलालाही मारहाण करण्यात आली.
बाथरूमचा दरवाजा फोडला अन्…
तसेच बाथरूमचा दरवाजा फोडून मोबाईल जमिनीवर आपटून तसेच घरातील नळाचे साहित्य तोडून नुकसान करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
सिटी चौक पोलिसांनी केली कारवाई
देविका विजय फुलारे (वय ४२, रा. गारखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी फुलारे या नातेवाईकांसह अरुणा गवळी हिच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा फिर्यादीने मला तीन मुलं असून, तू माझ्या नवऱ्याचा नाद सोड, ते तुला वारंवार फोनवर बोलतात, व्हिडिओ कॉल करतात, असे म्हणत अरुणाला समजावत असताना वादाला सुरुवात झाली. यावेळी अरुणा व तिच्या मुलाने शिवीगाळ करत मारहाण केली. प्लास्टिक खुर्ची डोक्यात मारल्याने गंभीर दुखापत झाल्याचा दावा केला आहे.
तरुणीवर सामूहिक अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, नृत्याची आवड असलेल्या बारामती तालुक्यातील एका तरुणीला कलाकेंद्रात काम व पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंबाजोगाई येथे आणून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : Uttarpradesh Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधातून रक्तरंजित शेवट, विवाहित महिला इंजिनिअरची कुऱ्हाडीने हत्या; नेमकं प्रकरण काय?






