Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: घरात सापडले तिघेही बेशुद्ध… दार उघडल्यानंतर समोर आलं हृदयद्रावक दृश्य! ऑनलाईन मागवलं ‘सोडियम नायट्रेट’ आणि…

पिंपरीतील मोरवाडी येथे आर्थिक विवंचनेतून एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. घरात कोळशाचा विषारी धूर करून व विषारी पदार्थाचा वापर केल्याने विनोद पिल्लाई यांचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 02, 2026 | 01:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक अडचणींमुळे पिंपरीतील एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती.
  • कुटुंबप्रमुख विनोद पिल्लाई यांचा मृत्यू, तर पत्नी आणि 19 वर्षीय मुलगी अतिदक्षता विभागात उपचाराधीन.
  • घटनास्थळी सुसाईड नोट, सोडियम नायट्रेटचे साहित्य आणि इतर पुरावे जप्त; मोबाईल व ऑनलाइन व्यवहारांची तपासणी सुरू.
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेतून एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेत कुटुंबप्रमुख विनोद पिल्लाई (50) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी आणि 19 वर्षीय मुलगी गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून, सोडियम नायट्रेटची ऑनलाइन खरेदी, मोबाईलमधील माहिती आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव विनोद पिल्लाई (५०) असे आहे. सिल्जा पिल्लाई (४५) आणि पूर्णिमा पिल्लाई (१९, सर्व रा. करिष्मा ग्लोरी हाउसिंग सोसायटी, मोरवाडी, पिंपरी; मूळ रा. केरळ) यांच्यावर उपचार सुरु आहे. संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पिल्लाई यांनी संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. ते खासगी कंपनीत नोकरीला होते, तर सिल्जा खासगी शाळेत समन्वयक आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये विनोद यांनी नौकरी सोडल्यांनंतर आर्थिक अडचणी वाढल्या. नंतर त्यांनी पिंपरीतील नेहरूनगर येथील स्वतःचे घर विकले आणि मोरवाडी परिसरात भाडेतत्त्वावरील घरात राहण्यास आले. मूळ गावी घराचे बांधकाम सुरु असून त्यामुळेही आर्थिक ताण वाढला. याच आर्थिक ताणामुळे त्यांनी टोकाचा पाऊल उचलला.

अविवाहित तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जायचे अन् नंतर…

‘सोडियम नायट्रेट’ ऑनलाईन मागवले…

शुक्रवारी मध्यरार्तीच्या सुमारास घरात कोळसा पेटवून त्यावर सोडियम नायट्रेट टाकला. त्यामुळे विषारी धूर निर्माण झाला. या धुरामुळे तिघेही बेशुद्ध झाले. शनिवारी सकाळी सिल्जा पिल्लाई शाळेत न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकशी केली. तेव्हा सोसायटीतील नागरिकांनी घराची पाहणी केली असता तिघेही बेशुद्धावस्थेत आढळले. तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने त्यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, विनोद यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर सिल्जा आणि पूर्णिमा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विनोद यांनी ‘सोडियम नायट्रेट’ हे रसायन ऑनलाईन पद्धतीने मागवले होते आणि ते त्यांना कुरिअरद्वारे घरपोच मिळाले होते. याशिवाय, विषारी धूर कसा तयार करायचा, याची माहिती त्यांनी इंटरनेटवरून घेतली होती का, याचाही शोध आता पोलीस घेत आहेत.

सुसाईड नोट

पोलिसांनी घटनास्थळावरून सोडियम नायट्रेटचा डबा, कुरिअरचे पाकीट, कोळसा आणि कोळशाची राख हे जप्त केले आहे. घटनास्थळी आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सुद्धा सापडली आहे. त्यात “आर्थिक अडचणींमुळे आम्ही जीवन संपविण्याचा निर्णय घेत असून, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये,” असा स्पष्ट उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस तपास सुरु

पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. पोलीस तिघांच्या फोनच्या डेटाची सखोल तपासणी करत आहे. या तांत्रिक तपासणीनंतरच आत्महत्येमागचे नेमके आणि स्पष्ट कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आई-मुलाच्या नात्याला काळीमा! मद्यधुंद अवस्थेत मुलाकडून आईवर लैंगिक अत्याचार, आरोपीला स्थानिकांकडून बेदम मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरात.

  • Que: या घटनेत काय घडले?

    Ans: आर्थिक विवंचनेतून कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगी उपचार घेत आहेत.

  • Que: पोलिसांच्या तपासात काय समोर आले?

    Ans: घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून मोबाईल, ऑनलाइन खरेदी, आर्थिक व्यवहार आणि इतर पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे.

Web Title: Pune crime a heart wrenching scene revealed after the door was opened sodium nitrite was ordered online and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
1

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त
3

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
4

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.