काय घडलं नेमकं?
आरोपीचं नाव विकास गायकवाड (३५ वर्ष) असे आहे. आठवीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता. मागील दोन ते तीन वर्षांपासून तो याच कोचिंग क्लासमध्ये रोज जायचा. याच दरम्यान ऑफिस बॉयने या आठवीत शिक्षण घेत असलेल्या मुलाला स्टोअर रूममध्ये घेऊन गेला. त्याला अनैसर्गिक स्पर्श करायला सुरुवात केली. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे ऑफिस बॉयने फोटो देखील काढले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आठवीतला मुलगा घरी जाऊन आई-वडिलांजवळ रडू लागला. त्याने क्लासला जायला नकार दिला. यामुळे वडिलांनी सगळी शहानिशा केली आणि क्लासमध्ये येऊन विचारपूस केली. तेव्हा घडलेला सगळा प्रकार समोर आला.
कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जानेवारी महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरु होता. मार्केट यार्ड पोलिसांनी या ऑफिस बॉयवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने अशा प्रकारचे कृत्य यापूर्वी इतर कोणासोबत केले आहे का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेनंतर संबंधित कोचिंग क्लासच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण संस्थांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
धक्कादायक घटना! वॉटर पार्कमधील निष्काळजीपणामुळे महिलेचे अर्धे शरीर निकामी; गुन्हा दाखल
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉटर पार्कमधील निष्काळजीपणामुळे महिलेचे अर्धे शरीर निकामी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पर्यटन केंद्राचा मालक व व्यवस्थापकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या ‘मोराची चिंचोली’ गावातील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रामध्ये घडली.
Ans: पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील कोचिंग क्लासमध्ये.
Ans: स्टोअर रूममध्ये नेऊन लैंगिक छळ केला आणि फोटो काढले.
Ans: आरोपीला अटक करून POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.






