Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकसाठी १ नोव्हेंबर २०२६ पासून नवे वाहतूक नियम लागू होणार आहेत. या नियमांनुसार ट्रक, कंटेनर आणि इतर मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेशबंदी असेल. कोणत्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करता येणार आणि कोणत्या वाहनांना जुन्या द्रुतगती मार्गाचा वापर करावा लागणार, जाणून घ्या सविस्तर माहिती.
Mumbai Pune Missing Link वरून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम, 'या' वाहनांना प्रवेशबंदी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकसाठी १ नोव्हेंबर २०२६ पासून सुधारित वाहतूक नियम लागू होणार आहेत. वाहनांचे प्रकार आणि वेगमर्यादा याबाबत वाहतूक पोलिसांनी निर्बंध निश्चित केले आहेत.

मिसिंग लिंकवरील बोगद्यांमधून प्रवास करताना वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे. बोगद्यांमधील सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

खासगी कार आणि नियमांनुसार पात्र हलक्या मोटार वाहनांना मिसिंग लिंकवरून प्रवास करता येईल. या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा ताशी १०० किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे.

प्रवासी बस आणि परवानगी असलेल्या इतर प्रवासी वाहनांना मिसिंग लिंकचा वापर करता येणार आहे. या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा ताशी ८० किलोमीटर असेल.

१ नोव्हेंबरपासून ट्रक, कंटेनर, पिकअप व्हॅन आणि टाटा एससारख्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेश मिळणार नाही. या वाहनांना जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा वापर करावा लागेल.

ज्वलनशील, स्फोटक किंवा इतर धोकादायक पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंकवरून प्रवास करता येणार नाही. या वाहनांनी जुन्या द्रुतगती मार्गानेच प्रवास करणे आवश्यक आहे.






