काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव डॉ. ए. बिन्नियमिन असे आहे. तो बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक सहाय्यक संचालक आहे. या प्रकरणातील ३० वर्षीय तरुणी बॉटनी या विषयात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करीत होती. तर आरोपी बिन्नियमिन हा तिचा गाईड होता. तो तिचा मानसिक छळ करत होता. या त्रासाला कंटाळून तरुणीने मित्राला फोन केला आणि मी आत्महत्या करते असे ती मित्राला म्हणाली. मित्राने फोनवर बोलण्यात गुंतवले, पण तो तिच्या घरी पोहचेपर्यंत उशीर झाला होता. शनिवारी 11 एप्रिल रोजी राहत्या घरी शाहूनगर येथे तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली.
सुसाईड नोटमध्ये काय?
आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने ऑगस्ट 2025 पासून बिन्नियमिन हा अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस आधी बिन्नियमिन याने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही. चूक झाली असे लिहून दिले होते. असे लिहून ठेवले.
आरोपी अटकेत
याप्रकरणी बिन्नियमिन याला अटक केली असून, त्याला बुधवार 15 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. याप्रकरणात आता पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भोर तालुक्यात रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; नैसर्गिक मृत्यू की घातपात? पोलिसांचा तपास सुरू
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किकवी-केंजळ रस्त्याच्या कडेला एका ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस याचा तपास सुरु केला आहे.
Ans: प्राध्यापकाकडून होत असलेला मानसिक छळ आणि गैरवर्तन.
Ans: विद्यार्थिनीचा गाईड असलेल्या प्राध्यापकाला अटक झाली.
Ans: सुसाइड नोटमधून ऑगस्ट 2025 पासून सुरू असलेल्या छळाचा खुलासा झाला.






