काय नेमकं प्रकरण?
सोलापूर मधील ऐश्वर्या श्रीमान हिचा विवाह 2017 मध्ये पंढरपूर मधील रोहन शिंदे नाईक सोबत झाला. वडिलांनी लग्नात 25 तोळं सोनं, अडीच किलो चांदी आणि 2 लाख रुपये कपडे, व्हिडिओ शुटींगसाठी दिले होते. लग्नानंतर 8-9 महिने माझा संसार नीट सुरू होता. मात्र, नंतर, त्यांच्या विविध उद्योगासाठी, पेट्रोल पंपासाठी, रोड काँट्रॅक्टसाठी 50 लाख रुपये माहेरहून आणण्याचा तगादा लावला. तसेच, पैसे न आणल्यास मूल न होऊ देण्याचा दबाव आणला. मूल झाले तर संपत्तीत वारस होईल, असेही संबंधित कुटुंबीय म्हणायचे. या सासरच्या छळाला कंटाळून ऐश्वर्या माहेरी गेली.
विवाह मोडवरुन तरुणीचा चाकूने वार करुन खून; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
घटस्फोट होण्याआधीच लग्न
या प्रकरणात विशेष म्हणजे, ऐश्वर्या माहेरी गेल्यानंतर रोहनने बारामतीमधील एका मुलीशी लग्न केले. ऐश्वर्या आणि रोहनचा घटस्फोट होण्याआधीच त्याने सदर लग्न केले. रोहनचा नगरसेवक भाऊ राहुल यांच्यासह कुटुंबाने माहेरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी, आम्ही एका कुटुंबाला असंच संपवलं असून तुम्हालाही संपवू अशी धमकी दिली. घटस्फोटासाठी दबाव देखील टाकण्यात येत असल्याचा आरोप पीडित विवाहितेने केला आहे.
गुन्हा दाखल
पंढरपूर शहर पोलिसात पीडित विवाहितेचा पती, दीर नगरसेवक राहुल सह १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप राजकीय दबावापोटी कोणालाही अटक झाली नाही, असेही पीडिताने म्हटले. तसेच, आम्हाला न्याया द्यावा, अशी मागणीही तिने केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
पंढरपूर हादरलं! तरुणीवर अॅसिड फेकून हल्ला, आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न
सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपुरात एका मुलीवर अॅसिड हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. वैष्णवी भागवत असे या हल्ला झालेल्या पीडित तरुणीचे नाव आहे. अज्ञात इसमाने तिच्या अंगावर ऍसिड टाकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तिला उपचारासाठी पंढरपूर शहरातील लाईफलाईन या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकारात अज्ञात तरुणाचा शोध सुरू केला असून या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी, गुन्हा नोंद करायची प्रक्रिया सुरू आहे.






