Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुन्हा संसार वाचवण्यासाठी गेली, पण जीव गमावला; पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीची केली हत्या

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात 25 वर्षीय रुतुजा तावरे हिची पतीने ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. या प्रकरणी राजगड पोलिसांनी पती अक्षय तावरेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 20, 2026 | 08:18 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरगुती वादातून पत्नी रुतुजा तावरे हिची हत्या केल्याचा आरोप.
  • पती अक्षय तावरेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल; आरोपी फरार.
  • यापूर्वीही मारहाणीच्या तक्रारीनंतर दोघांमध्ये तडजोड झाली होती.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हवेली तालुक्यातील आर्वी गावात एका २५ वर्षय विवाहितेची ओढणीने गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. लग्नानंतरच्या अवघ्या काही महिन्यांतच पती-पत्नीमध्ये घरगुती वादाला सुरुवात झाली होती, याच वादातून ही हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

हत्या झालेल्या महिलेचे नाव रुतुजा अक्षय तावरे असे आहे. तर आरोपी पतीचं नाव अक्षय रामदास तावरे असे आहे. ऋतुजा आणि अक्षय यांचा विवाह १६ मे २०२६ रोजी झाला होता. परंतु लग्नाच्या सहा महिन्यानंतरच त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली. हळू हळू तो वाद विकोपाला गेला आणि अक्षयकडून रुतुजाला मारहाण सुरु झाली. या मारहाणीचा कंटाळून सहा महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी पणदरे येथे रुतूजा निघून गेली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी बारामती महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. जिथे दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत तडजोड होऊन ती पुन्हा आपल्या पतीसोबत राहायला गेली होती. मात्र पुन्हा काही दिवसांनी दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. एप्रिल २०२६ मध्ये ती पुन्हा माहेरी आली होती. ४ मे २०२६ रोजी भावाने तिला सासवड येथे सोडले तेव्हा आरोपी अक्षयने तिला आर्वीला नेले. तिथे तिची आढणीने गळा आवळत हत्या केली.

‘या’ कारणावरुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव; पुण्यातील गोखलेनगर प्रकरणात धक्कादायक खुलासा

मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास रुतुजाचे मामा बजरंग काशिद यांना तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. याची माहिती राजगड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुतुजाला तातडीने श्लोक हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याची माहिती पोलिसांनी रुतुजाच्या कुटुंबियांना दिली. रुतुजाच्या भावाने, अनिकेत पवार यांनी खेड-शिवापूर पोलीस चौकीत जाऊन अक्षय तावरे याच्या विरोधात लेखी तक्रार दिली.

आरोपी फरार

राजगड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 आणि 85 अन्वये आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अक्षय तावरे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ऋतुजाच्या मृत्यूने तिच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आअसून परिसरात संताप व्यक्त केलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच आरोपीला जेरबंद केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर फिल्मी स्टाईल दरोडा! कांद्याने भरलेली पिकअप अडवून चालक-मालकाला बेदम मारहाण; १० लाखांचा मुद्देमाल लंपास

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: रुतुजा अक्षय तावरे असे मृत महिलेचे नाव आहे.

  • Que: हत्या कशी करण्यात आल्याचा आरोप आहे?

    Ans: पती अक्षय तावरे याने ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: राजगड पोलिसांनी पतीविरोधात BNS कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Pune crime she went to save her marriage but lost her life husband strangled his wife to death with her odhni scarf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
2

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.