Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Nagpur Crime : अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि पोक्सो प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याने पोलिसांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आरोपी चौकशीदरम्यान एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देत नसल्याने जबाब अद्याप नोंदवता आलेले नाही .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 07, 2026 | 02:32 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • डोके आपटत पोलिसांवर केला आरोप
  • पासवर्ड अद्याप गुप्त
  • तांत्रिक पुरावे निर्णायक
  • पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Nagpur : आरोपी हा पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करत नसून , उलट त्यानेच ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. प्रश्नांचा भडीमार करून पोलिसांच्या नाकीनऊ आणले. त्याने डोके आदळून घेत स्वतःला जखमी करून घेतले आणि न्यायालयात पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डोळ्याला जखम असल्याने त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत. हतबलतेमुळे या संवेदनशील प्रकरणासंबधी तपासाची गती मंदावली, अशी पोलिस वर्तुळात चर्चा आहे. आकाश ऊर्फ निर्भय पाखरे (२०, रा. ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलिस ठाण्यात अपहरण, लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.

Nagpur : एआय एमआरओला संपाचा फटका; कामकाज अजूनही संथ

न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानुसार गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. तत्पूर्वी बुधवारच्या रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी हा ठाणे शहरातील आहे. पीडिता २६ वर्षांची असून इयत्ता बारावीत शिकते. आरोपीने एखादा चित्रपट, वेब सिरिज पाहून हे कृत्य केले काय, या दिशेनेही तपास सुरू आहे.

पासवर्ड अद्याप गुप्त

तपासादरम्यान आरोपीने त्याच्या मोबाईलचा पासवर्ड देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सायबर पथक तांत्रिक माध्यमातून मोबाईलमधील माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे संकलित केले असून वैद्यकीय अहवालाचीही प्रतीक्षा आहे .

तांत्रिक पुरावे निर्णायक

प्राथमिक तपासानुसार, आरोपीने पीडित मुलीच्या मोबाईलवर नियंत्रण मिळविल्याचा संशय आहे. आरोपीने मोबाईलमधील काही माहिती किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. सध्या पोलिसांकडे पीडितेचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळावरील वैज्ञानिक नमुने हे महत्वाचे पुरावे आहेत. डिजिटल पुरावे हाती लागल्यास आरोपपत्र अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे.

Nagpur News : लग्नपत्रिका डाऊनलोड करताच मोबाईल हॅक ;६लाखांची सायबर फसवणूक

पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिला भाड्याच्या घरात तब्बल २४ तास डांबून ठेवले होते. नग्न करून तिचे हात-पाय बांधले. तिला ठार मारण्याच्या उद्देशाने शरीराच्या विविध भागावर जखमा केल्या. तिच्यावर रात्रभर अत्याचार केला. दरम्यान मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिवी सिनेस्टाईल सुटका केली.

Web Title: Nagpur kidnapper gives the police a tough time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime News
  • Nagpur News
  • police

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
2

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
3

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
4

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.