Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: खाकी वर्दीचा रुबाब महागात; अपॉइंटमेंटसाठी महिला बनली PSI! तोतया महिला पोलिस जेरबंद

पुण्यातील कॅम्प परिसरात पोलिसांची वर्दी घालून PSI असल्याचा आव आणणाऱ्या 25 वर्षीय तरुणीला लष्कर पोलिसांनी अटक केली. क्लिनिकमध्ये लवकर अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तिने खाकी वर्दीचा वापर केला होता. चौकशीत ती तोतया पोलीस असल्याचे उघड झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 08, 2026 | 10:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • क्लिनिकमध्ये दबाव टाकण्यासाठी तरुणीने पोलिसांची वर्दी परिधान केली.
  • संशय आल्याने पोलिसांनी चौकशी करत तोतया महिला पोलिसाचा पर्दाफाश केला.
  • आरोपी समिना इनामदार हिला लष्कर पोलिसांनी अटक केली.
पुणे: पुण्यात खाकी वर्दीचा रुबाब दाखवत लोकांवर दबाव टाकणाऱ्या एका तोतया महिला पोलिसाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खांद्यावर स्टार आणि अंगावर पोलिसांची वर्दी घालून क्लिनिकमध्ये थेट पोलीस अधिकारी असल्याचा आव आणणाऱ्या 25 वर्षीय तरुणीला लष्कर पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत समोर आलेलं कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील महिला आरोपीचे नाव समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय 25 वर्षे) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामानाचे पोलीस दलात भरती होऊन पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते, मात्र ते भंगले होते. सध्या ती एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. ६ जून रोजी
लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे आपल्या पथकासह कॅम्प परिसरात गस्तीवर होते. दरम्यान त्यांना एका नामांकित खाजगी क्लीनिकच्या बाहेर एक महिला पोलिसांच्या वर्दीत उभी दिसली. तिच्या खांद्यावर पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे स्टार्स होते.

Nagpur Crime: नदीच्या खोलीचा अंदाज चुकला अन् होत्याचं नव्हतं झालं; बाप-लेकासह तिघांचा नदीत बुडून मृत्यू

नेमप्लेट चुकीच्या पद्धतीने लावलेली

महेश शिंदे यांनी जेव्हा त्या महिला अधिकाऱ्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना तिच्या गणवेशावर लावलेली ‘नेमप्लेट’ चुकीच्या पद्धतीने लावल्याचे दिसून आले. पोलीस खात्यातील शिस्तीनुसार गणवेशावरील प्रत्येक गोष्ट ठराविक ठिकाणीच असावी लागते. नेमप्लेटच्या या चुकीमुळे सहाय्यक फौजदार शिंदे यांच्या मनात तात्काळ संशयाची पाल चुकचुकली.

संशय आल्याने सहाय्यक फौजदार महेश शिंदे यांनी अत्यंत चाणाक्षपणे तिच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. “तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहात?” असे विचारले असता, तिने आपण ‘बाणेर पोलीस ठाण्यात’ कार्यरत असल्याचे सांगितले.

तिच्या उत्तरावर पूर्ण विश्वास न बसल्याने शिंदे यांनी तात्काळ लष्कर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बोलावून घेतले. महिला पोलिसांनी समिनाची कसून चौकशी केली आणि तिच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. पोलिसांच्या कडक चौकशीसमोर बोलती बंद पडली आणि ती पोलीस खात्यात नसल्याचे उघड झाले.

कारण काय?

समिना हिला कॅम्प परिसरातील एका नामांकित क्लिनिकमध्ये उपचारासाठी डॉक्टरांची वेळ हवी होती. मात्र, गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे तिला अपॉइंटमेंट मिळत नव्हती. त्यामुळे तिने थेट पोलिसांचा गणवेश परिधान केला आणि क्लिनिकमधील रिसेप्शनिस्ट तसेच इतर लोकांवर आपण पोलीस अधिकारी असल्याचा दबाव टाकून लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला.

गुन्हा दाखल

याप्रकरणी लष्कर पोलिसांनी आरोपी समिना इनामदार हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून, तिने यापूर्वी अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Sangli Crime: डोक्यात मारहाण करून हत्या, नंतर अपघाताचा बनाव, मेहुण्यानेच दिली भाऊजींची सुपारी; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी महिलेचे नाव काय आहे?

    Ans: आरोपी महिलेचे नाव समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण आहे.

  • Que: तिने पोलिसांची वर्दी का घातली होती?

    Ans: क्लिनिकमध्ये लवकर अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तिने पोलिसांची वर्दी घातली होती.

  • Que: पोलिसांना तिच्यावर संशय कसा आला?

    Ans: तिच्या हालचाली आणि वावर संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केली.

Web Title: Pune crime the allure of the police uniform proves costly woman posed as a psi to secure a job impostor female cop arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?
3

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.