काय घडलं नेमकं?
या दुर्दैवी घटनेत रोहित कैलास नागदेवे (वय 33), गौतम राजकुमार अंबादे (वय 31) आणि मुलगा चैतन्य गौतम अंबादे (वय 6) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चैतन्य हा पाण्यात बुडत होता त्यावेळी त्याचे वडील गौतम अंबादे यांनी नदीकडे तातडीने धाव घेतली. त्यावेळी रोहित नागदेवे यांनी देखील त्या मुलाला वाचवण्यासाठी नदीत उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला.
Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई! ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक
तपास सुरू
या दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसाना देण्यात आली. अथक प्रयत्नांतून तिघांनाही नदीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अकस्मात निधन असल्याचे सांगत, प्रकरण तपास सुरू ठेवला आहे.
NEET विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर नवा ट्विस्ट; सुसाईड नोटवरून पोलिसांच्याच भूमिकेवर संशय
देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी आणि फेरपरीक्षेच्या वादात नागपूरमधील 19 वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदीच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडवली होती. मात्र आता या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. आकांक्षाने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून नागपूर पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटी समोर आल्या असून, ही नोट अनेक दिवस लपवून ठेवण्यात आली होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यावरच वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
२० मे रोजी आकांक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करून एनडीए (NTA) आणि सरकारवर टीका केली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता, पोलिसांनी “अशी कोणतीही सुसाईड नोट आमच्याकडे नाही, ती असल्यास चतुर्वेदी कुटुंबाने पोलिसांकडे सुपूर्द करावी,” अशी तोंडी माहिती दिली होती. चार जूनपर्यंत पोलिसांनी हाच दावा केला होता.
मात्र आता ही सुसाईड नोट पहिल्याच दिवसापासून तपास अधिकारी निखिल तव्हाणे यांच्याकडे होती. त्यांनी स्टेशन डायरीमध्ये आणि आत्महत्येशी संबंधित कागदपत्रांमध्ये या सुसाईड नोटची नोंदच केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी हयगय केल्याचा आरोप करत निखिल तव्हाणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
Ans: ही घटना नागपूर ग्रामीणमधील कन्हान नदीच्या महादेव घाट परिसरात घडली.
Ans: रोहित नागदेवे, गौतम अंबादे आणि 6 वर्षीय चैतन्य अंबादे यांचा मृत्यू झाला.
Ans: मुलगा पाण्यात बुडताना दिसल्याने त्याला वाचवण्यासाठी दोघे नदीत उतरले, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले.






