
crime (फोटो सौजन्य: social media)
Nanded Crime : हदगावमध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्याची हत्या; सूत्रधार निघाली सूनच, धक्कादायक कट उघड
काय घडलं नेमकं?
आरोपी शैलेंद्र आणि मृतक नम्रता हे दाम्पत्य वाडेबोल्हाई परिसरात राहत होते. नम्रता हिचे काही सोन्याचे दागिने गहाण ठेवलेले होते. ते दागिने सोडवून देण्याची मागणी ती वारंवार पतीकडे करत होती. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी शैलेंद्र याने नम्रता हिला वाडेबोल्हाई परिसरात बोलावून घेतले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या शैलेंद्र याने त्याच्याकडील लोखंडी चाकूने नम्रताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. या हल्ल्यात नम्रता गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
गुन्हा दाखल
या प्रकरणाची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपी शैलेंद्र व्हटकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला
पुणे येथील कोथरुद्ध परिसरात एक धक्कदायक घटना घडली. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार भर रस्त्यात घडला. या घटनेमुळे स्थानिक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना १७ जानेवारी रोजी सायंकाळी घडली.
Beed Crime: भरदिवसा तरुणावर लोखंडी रॉड-काठ्याने अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल
Ans: पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई (ता. हवेली) परिसरात ही घटना घडली.
Ans: पत्नीने गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवण्याची वारंवार मागणी केल्याने दोघांत वाद झाला.
Ans: लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला असून चाकू जप्त केला आहे.