Beed Crime: भरदिवसा तरुणावर लोखंडी रॉड-काठ्याने अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल
काय नेमकं प्रकरण?
हत्या झालेल्या कमलबाई या हादगावमधील गौतमनगर वास्तव्यास होत्या. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांना अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी मिळाली होती.
त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्याचे देखील दोन महिन्यांपूर्वीच त्याचे लिव्हर खराब झाल्याने निधन झाले होते. मुलाच्या मृत्यूनंतर सासू आणि सून यांच्यात घरगुती कारणावरून आणि चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद होत होते.
नातवाने तक्रार दिली तक्रार
१३ जानेवारी रोजी कमलबाई बेपत्ता झाल्या होत्या. याची तक्रार त्यांच्या नातवाने नोंदवली होती. मात्र केवळ २ तासांतच पोलिसांना एक अज्ञात महिलेचा मृतदेह मिळून आला. संशय बळावल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला आणि कमलाबाईच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासले. या तपासात सुनेच्या हालचाली संशयास्पद आढळल्या आणि गुन्हयाचे सर्व धागेदोरे उघड झाले. सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनमध्ये सुनीताचा प्रियकर आणि भावाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.
कशी केली हत्या?
कमलबाई गाढ झोपेत असतांना सून सुनीता आणि तिचा प्रियकर परमेश्वर वानखेडे यांनी स्कार्फने गळा आवळून त्यांची हत्या केली. यात सुनेच्या भावाचा देखील सहभाग होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेहाची व्हिलेवाट लावली. पोलिसांनी चारही आरोपीला अटक केली आहे. त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Ans: नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे.
Ans: मृत महिलेची सून सुनीता.
Ans: कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे.






