Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात विषारी दारूचं थैमान! 15 जणांचा मृत्यू, पोलिस आयुक्तांचा दणका; अनेक अधिकारी निलंबित

पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्रकरणात 15 जणांचा मृत्यू झाला. दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचा संशय असून मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर पोलिस आयुक्तांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 30, 2026 | 11:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हडपसर आणि फुगेवाडीत विषारी दारू पिऊन 15 जणांचा मृत्यू.
  • दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचा संशय; मुख्य आरोपी योगेश वानखेडे अटकेत.
  • कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अनेक पोलीस अधिकारी निलंबित.
पुणे: पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली. फुग्यातून मिळणाऱ्या दारू मधून १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फुगेवाडी आणि हडपसर परिसरात अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकली जायची. मात्र याकडे पोलिसांच साफ दुर्लक्ष होत. या मुळेच या परिसरात दारू विक्री केली जायची. या घटनेतील मुख्य आरोप योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली आहे. त्याने या दारूमध्ये मिथेनॉल मिक्स केलेल असाव अशी शक्यता आहे. कारण याने जास्त नशा होते आणि दारुच्या प्रमाणात वाढ होते म्हणून त्याने हे कृत्य केल. तो कॅन मधून भेसळ केलेली आपली दारू विक्री करत होता. मात्र याच कॅन मधल्या दारूने हडपसर परिसरात तब्बल ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर फुगेवाडी परिसरात १० जणांचा मृत्यू झाला. याची कल्पना पोलिसांना नव्हती का? असा संतप्त सवाल नागरिक विचारात आहे. आता याच प्रकरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर म्हणून त्यांनी थेट ८ पोलिस अधिकाऱ्यांच निलंबन केल आहे.

Solapur Crime: ‘तुला जिवंत राहू देणार नाही’; सततच्या धमक्या, बेदम मारहाण… हातावर आरोपींची नावे लिहित 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

८ पोलिस अधिकाऱ्यांच निलंबन

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई करत तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केल आहे आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित केल आहे. तर त्यांची वेगळ्या विभागात बदली सुद्धा करण्यात आली आहे.

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणी 10 जणांच्या मृत्यू नंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे मोठी कारवाई केली आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसेच तपास पथकाचे इंचार्ज आणि 4 कर्मचारी निलंबित केले आहेत. तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची पोलीस नियंत्रण कक्षात रवानगी केली आहे.

स्थानिक नागरिक संतप्त

फक्त अधिकाऱ्यांच निलंबन करून चालणार आहे का ? या परिसरात दारू विक्री होत असताना पोलीस काय करत होते? त्यांना याची कल्पना नव्हती का? आता तरी पोलीस शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करणार का? असे संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातून आणि शहरातून गुन्हेगारीच्या बातम्या सतत आणि दररोज वाचायला मिळत आहे. आता या भेसळ दारूने एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Jalgaon Crime: ‘मी जिवंत आहे!’ तरुणीच्या एका वाक्याने हत्याकांडाचा संपूर्ण तपास उलटला; नेमकं काय प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: विषारी दारू प्रकरणात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या प्रकरणात एकूण 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Que: मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: योगेश वानखेडे हा मुख्य आरोपी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: घटनेनंतर पोलिस प्रशासनाने काय कारवाई केली?

    Ans: कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Pune crime toxic liquor havoc in pune 15 dead police commissioner cracks downseveral officers suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
2

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
3

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
4

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.